loader image
[ays_poll id=7]

लासलगाव जवळ रेल्वे लाईनचे काम करणाऱ्या चार कामगारांना टॉवर वॅगन ट्रेन ने उडवले ; चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Feb 13, 2023

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. लासलगाव येथे टॉवर वॅगन ट्रेनने 4 कामगारांना उडवले. या अपघातात चारही कर्मचाऱ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. लासलगाव-उगाव रेल्वे स्थानकादरम्यान हा भीषण अपघात झाला. अपघाताला बळी पडलेले सर्व कर्मचारी रेल्वेचे गँगमन असून ते रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीत गुंतले होते, असे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ५.४४ च्या सुमारास हा अपघात झाला. टॉवर वॅगन ट्रेन (लाइट फिक्सिंग इंजिन) लासलगावकडून उगावकडे चुकीच्या मार्गाने जात होती. लासलगाव ते उगावच्या दिशेने पोल क्रमांक 15 ते 17 पर्यंत ट्रॅक देखभालीचे काम सुरू होते. तेव्हा हा अपघात झाला. संतोष भाऊराव केदारे (वय ३८ वर्षे), दिनेश सहादू दराडे (वय ३५ वर्षे), कृष्णा आत्माराम अहिरे (वय ४० वर्षे) आणि संतोष सुखदेव शिरसाठ (वय ३८ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. ही हृदयद्रावक घटना समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. लाइट दुरुस्तीचे इंजिन चुकीच्या दिशेने आल्याने चार रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.