loader image
[ays_poll id=7]

पत्रकार वारिशे यांच्या कुटुंबियांना २५ लाखाची मदत – राज्य सरकारची घोषणा

Feb 14, 2023

हत्या झालेले राजापूर
येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून २५ लाख रुपयांची मदत देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्यांच्या मुलाला कायमस्वरुपी नोकरीचीही हमी मंत्री सामंत यांनी घेतली आहे. वारिशे यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील पत्रकारांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केला जात आहे. पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत पालकमंत्री सामंत यांनी तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपये आणि इतर माध्यमातून पंधरा लाख रुपये मदत वारिशे यांच्या कुटुंबीयांना देण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी जाहीर केले. या शिवाय वारिशे यांच्या मुलाला कायमची नोकरी देण्याची जबाबदारीही सामंत यांनी स्वीकारली.

अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
.