loader image
[ays_poll id=7]

राज्यातील शिक्षकांना तीन दिवसाची विशेष रजा मंजूर – शाळांना पाच दिवस सुट्ट्या

Feb 14, 2023


राज्यातील शिक्षकांना तीन दिवसाची विशेष रजा राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे राज्यातील शिक्षकांसहित शाळांना आता लागोपाठ पाच दिवस सुट्ट्या राहणार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन रत्नागिरी येथे 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. यामुळे या शिक्षक संघाचे अधिवेशनासाठी राज्य शासनाकडून तीन दिवसाची विशेष रजा मंजूर झाली आहे.

म्हणजेच आता तीन दिवसाच्या विशेषणाचा आणि शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या अशा लागोपाठ पाच दिवस महाराष्ट्रातील शाळांना सुट्ट्या राहणार आहेत. 15 फेब्रुवारीपासून म्हणजेच बुधवारपासून ते 19 फेब्रुवारी पर्यंत अर्थातच शिवजयंती, रविवार पर्यंत राज्यातील शिक्षकांना रजा राहणार आहेत.

 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे यंदाचे अधिवेशन रत्नागिरी येथे 17 फेब्रुवारी रोजी आयोजित झाले आहे. रत्नागिरी येथील चंपक मैदानावरील अधिवेशन राहणार असून या अधिवेशनासाठी राज्यातील लाखों शिक्षक हजेरी लावणार आहेत. याशिवाय अधिवेशनासाठी राजकारणातील दिग्गज लोकांची देखील हजेरी विशेष लक्षणीय राहणार आहे.

या अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार, उद्योग मंत्री उदय सामंत आणि शंभूराजे देसाई यांच्या समवेतच राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्रिगनाचीं उपस्थिती राहणार आहे.

या संघटनेचे एकूण दोन लाख सभासद कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत या संघटनेच्या अधिवेशनासाठी राज्यातील बहुतेक शिक्षक हजर राहणार आहेत. यामुळे राज्य शासनाने या अधिवेशनासाठी उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांच्या सोयीसाठी 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान शिक्षकांना विशेष रजा मंजूर केली आहे.

या अधिवेशनासाठी तीन दिवसाची विशेष रजा आणि 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र निमित्त सुट्टी आणि रविवारी 19 फेब्रुवारी रोजीचीं सुट्टी अशी सलग पाच दिवस सुट्टी शाळांना राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी येथील अधिवेशनात शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि मागण्यांवर सविस्तर अशी चर्चा होणार आहे. यामध्ये जुनी पेन्शन योजना, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी, समाजशास्त्र शिक्षकांना संरक्षण, जुन्या अवघड क्षेत्रातील शिक्षकांना बदलीमध्ये वाढीव संधी, विनाअट घरभाडेभत्ता, महापालिका वाढीव हद्दीतील शाळांचे शिक्षकांसह वर्गीकरण, एम एस सी आय टी मुदतवाढ, शिक्षण सेवक भरती, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नती या मागण्यांचा समावेश राहणार आहे.

याशिवाय इतरही अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर या अधिवेशनात चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिक्षकांचे हे प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्री शिंदे स्वतः अधिवेशनाला हजर राहणार असल्याने त्यांच्या पुढ्यात उपस्थित केले जाणार असून या प्रश्नांवर मुख्यमंत्री शिंदे काय ग्वाही देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर शिवसेनेतर्फे प्रभु श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती संपन्न

मनमाड शहर शिवसेनेतर्फे प्रभु श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे आज अयोध्या येथे प्रभू...

read more
सारथी मित्र मंडळ तर्फे सन 1990 व 1992 साली झालेल्या श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात  सक्रिय सहभाग घेतलेल्या कारसेवकां चा गौरव

सारथी मित्र मंडळ तर्फे सन 1990 व 1992 साली झालेल्या श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या कारसेवकां चा गौरव

मनमाड - आज समस्त विश्वातील हिंदूना गर्व अभिमान वाटेल असा ऐतिहासिक क्षण श्रीराम जन्मभूमी मुक्त झाली...

read more
बघा व्हिडिओ-ओम मित्र संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा धार्मिक परंपरा नुसार श्रीराम रक्षा पठण, भजन महाआरती करून साजरा

बघा व्हिडिओ-ओम मित्र संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा धार्मिक परंपरा नुसार श्रीराम रक्षा पठण, भजन महाआरती करून साजरा

मनमाड - ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड तर्फे विश्वातील समस्त हिंदू धर्माला...

read more
टीम कॅट व मनमाड शहर व्यापारी महासंघ यांच्या वतीने भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती

टीम कॅट व मनमाड शहर व्यापारी महासंघ यांच्या वतीने भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती

याप्रसंगी 1008 श्रीफळांनी श्रीराम या नावाची आरास काढण्यात आली. याप्रसंगी व्यापारी महासंघाचे...

read more
बघा व्हिडिओ – छत्रे विद्यालयातील श्रीराम सहस्त्रनाम जप रांगोळीने वेधले लक्ष

बघा व्हिडिओ – छत्रे विद्यालयातील श्रीराम सहस्त्रनाम जप रांगोळीने वेधले लक्ष

मनमाड शहरातील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या छत्रे विद्यालयात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त...

read more
प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड च्या गिरी प्रेमींनी दुर्ग पूजन व ध्वजारोहण करत साजरा केला मूर्ती प्रतिष्ठापना क्षण

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड च्या गिरी प्रेमींनी दुर्ग पूजन व ध्वजारोहण करत साजरा केला मूर्ती प्रतिष्ठापना क्षण

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अगस्ती ऋषींचा वास्तव्य असलेल्या किल्ले अंकाई...

read more
.