loader image
[ays_poll id=7]

रेल्वे अपघातात मृत्यमुखी पडलेल्या चार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना एन.आर.एम.यु तर्फे प्रत्येकी एक लाखाची मदत

Feb 15, 2023

पुसलेल्या कुंकूवाचं मोल आम्ही काय करणार ?
मदत नव्हे जगण्याला बळ देण्याचा अल्पसा प्रयत्न ….!
13 फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वे भुसावळ विभागात लासलगाव नाजिक घडलेल्या चार उमद्या तरुण कर्मचाऱ्यांच्या जीवघेण्या अपघातामुळे
दुःखाचे सावट अवघ्या रेल्वे परिसरावर आहे.हे चार तरुण कर्मचारी स्थानिक असल्याने याचा प्रचंड रोष परिसरात जाणवला पोलिस बंदोबस्तात अंतिम संस्कार आटोपल्यानंतर प्रशासनाने ही तत्काळ मदत जाहिर करून रोष कमी करण्याचा प्रयत्न केला.सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली असून जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.हा घटनाक्रम घडत असताना या सगळ्या मध्ये दिवंगत कर्मचारी ज्या कामगार संघटनाशी संबधित होते त्या संघटना भक्कमपणे त्यांच्या परिवाराच्या पाठीशी उभे असल्याचे प्रकर्षाने जाणवत होते.वरील शिर्षकाखाली विविध समाज माध्यमातून संदेश फिरत होते.नॅशनल रेल्वे मजदुर युनियन ही रेल्वे कर्मचाऱ्याची मान्यताप्राप्त संघटना असून त्या माध्यमातून अनेक कर्मचारी हिताचे कार्य केले जाते.रक्तदान शिबीर,नेत्रदान शिबीर,प्रासंगिक आंदोलने हे या संघटने मार्फत प्रभावीपणे केले जातात कर्मचारी व परिवाराचे कल्याण आणि विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी रेल्वेच्या प्रत्येक कार्यालयात अनेक प्रतिनिधी आप आपले कार्य करीत असतात.प्रशासन व कर्मचारी यांच्यातील दुवा या नात्याने संघटना सतत कार्यरत असतात कर्मचाऱ्यांना ही खूप मोठा आधार असल्याने कठीण काळात ही युनियन तग धरून आहे.नॅशनल रेल्वे मजदुर युनियनच्या मुख्यालयातील महामंत्री मा.वेणू पी नायर यांनी मनमाड येथे भेट देऊन अशा दुःखद प्रसंगी आपली संवेदना प्रकट केली. मनमाड स्टेशन वर सुरक्षा संबधी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून काल अपघातात ठार झालेल्या दिवंगत तरुणांच्या चारही घरी भेट देऊन परिवाराचे सांत्वन करून परिवारातील माता भगिनींना युनियन त्यांच्या बरोबर असल्याचे सांगून आश्वस्त केले. त्याच बरोबर काल मुख्यालय येथे मध्य रेल्वे महाप्रबंधक यांच्याशी चर्चा झाली असून प्रशासन तत्काळ मदत करणार तर आहेच सोबतच परिवारातील एकाला रेल्वेची नोकरी व संभाव्य कायद्यानुरुप शक्य ती आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची माहिती दिली.तत्पूर्वी सरकारी मदत पोहचेल तेव्हा पोहचेल मात्र लगेचच महामंत्री यांनी प्रत्येकी 1,00000 ( एक लाख रुपये) चेक ने देऊन दिवंगताच्या परिवाराला मदत केली.या एक लाखाचे मूल्य जिवाच्या मुल्या समोर काहीच नसून ही मदत म्हणून नाहीतर भावांनी आधार गमावलेल्या बहिणींना दिलेली सांत्वना भेट आहे असे प्रतिपादन केले.पुसलेल्या कुंकूवाचं मोल आम्ही काय करणार ही मदत नव्हे तर अल्पसा दिलासा आहे अश्या भावना येथील मनमाड एन आर एम यू चे सचिव अंबादास निकम यांनी बोलून दाखवल्या.
खरे तर आभाळभर दुखं पेलवण्याचे सामर्थ्य नियती कालपरत्वे कुटुंबीयांना देईल पण दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आधार देणे त्यांच्या वेदना वाटून घेणे हे आम्ही आमच्या एन आर एम यू परिवाराचे कर्तव्य मानतो आणि महामंत्री वेणू जी नायर यांना धन्यवाद देतो की जी एम सोबत तत्काळ चर्चा करून प्रशासना कडून लवकरात लवकर सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याचे त्यांना सुचवले आहे.प्रशासना कडून देण्यात येणारी मदत देखील कुटुंबांना मिळेल या दुःखद प्रसंगी युनियन सदस्य आहेत की नाही हा भेदभाव न करता सरसकट रेल्वे कर्मचारी या नात्याने प्रसंगाला ते उभे राहिले त्या बद्दल मनमाड अध्यक्ष शबरीश नायर व असंख्य रेल्वे कर्मचाऱ्यां तर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी   रुपये 1,09,000/- किंमतीचे विक्रमी शिल्लक औषधं संकलन ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रुपये 1,09,000/- किंमतीचे विक्रमी शिल्लक औषधं संकलन ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड शहरातील अग्रगण्य अशा या शिक्षणसंस्थेचा २३ वा वर्धापन दिन कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल आणि...

read more
गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

मनमाड : मनमाड शहरातील गुरुद्वारा हा आपल्या भारत देशातील शिख धार्मियांचा अत्यंत पवित्र आणि मुख्य...

read more
मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७  फेब्रुवारी रोजी.

मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७ फेब्रुवारी रोजी.

मराठी भाषा गौरव दिनानिमिताने कार्यक्रम मनमाड(प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघाने आयोजित केलेल्या...

read more
मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो, उपमुख्याध्यापिका सिस्टर...

read more
.