loader image
[ays_poll id=7]

महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर राहणार २४ तास खुले – विविध कार्यक्रमांचे आयोजन

Feb 17, 2023

महाशिवरात्रीनिमित्त शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी त्र्यंंबकेश्वर मंदिरात सुमारे तीन लाख शिवभक्त दर्शनाला येण्याची शक्यता असल्याने देवस्थान ट्रस्टने मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गर्भगृहात मात्र प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे.

त्र्यंबकेश्वराची महाशिवरात्रीला दुपारी पालखी काढण्यात येणार आहे. मध्यरात्री महापूजा होणार आहे. देवस्थानकडून भाविकांना गायत्री मंदिराजवळ प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करुन सजविण्यात आले आहे. तसेच मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार – उत्तर आणि पूर्व महाद्वार आदी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येणार आहे.

येणार्‍या भाविकांची सोय ही नुकत्याच बांधण्यात आलेल्या भव्य दर्शन मंडपातून व त्याच्या दोन्ही विंग मधून करण्यात येणार आहे. दर्शनार्थ येणार्‍या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. तातडीने दर्शन घेऊ इच्छिणार्‍या भाविकांसाठी देणगी दर्शन संपूर्ण दिवसभर सुरु राहणार आहे. देणगी दर्शनासाठी आलेल्या भाविकांकरिता सर्व सुविधांनी युक्त भव्य दर्शन मंडप बनविण्यात आलेला आहे. पालखी मंदिरातून निघून पाचआळी मार्गे पारंपरिक मार्गानुसार तिर्थराज कुशावर्त कुंडावर जाईल. षोडशोपचार पूजा करुन संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पालखी पुन्हा देवस्थानमध्ये येणार आहे.

महापूजा करताना ज्योर्तिलिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी होईल. तर मध्यरात्री १२ ते २.३० वाजेच्या दरम्यान महापूजा करण्यात येईल. देवस्थानकडून ३ दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यात शुक्रवारी संध्याकाळी ६.०० ते रात्री ७.३० वाजेपर्यंत प्रसिद्ध सितार वादक पं. निलाद्री कुमार यांचा सितारवादनाचा कार्यक्रम व रात्री ७.३० ते ९.०० वाजेपर्यंत कथ्थक नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.

दि. १८ रोजी दुपारी २ वाजता रा.स्व.संघाकडून घोष वादन तसेच सायंकाळी ५.३० वाजता समूह बासरी वादन होईल.७.३० ते ८.३० यावेळेत कीर्तनकार चंद्रशेखर शुक्ल यांचा शिवस्तुती हा कार्यक्रम होणार आहे. दि. १९ रोजी सायंकाळी ७.०० वाजता पं.प्रसाद दुसाने यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजीत केलेला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पटांगणात हे कार्यक्रम होणार आहेत.
महाशिवरात्र पर्व काळासाठी नाशिक – त्र्यंबक मार्गावर राज्य परिवहन महामंडळाकडून जादा एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सोडण्यात येणार आहे.त्याचबरोबर नाशिक मनपाच्या सिटीलिंक या गाड्याही या मार्गावरून धावणार आहेत.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
.