loader image
[ays_poll id=7]

चला गड किल्ला बनवुया , मातीशी नाते जोडूया….नांदगाव-मनमाड पत्रकार संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्पर्धेचे आयोजन…..

Feb 17, 2023


मनमाड :  ‘चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या’ हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती निमित्त नांदगांव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने शिवरायांच्या गड किल्ल्यांची प्रतिकृतीचे मातीचे किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित केली असून मनमाड शहरातील नागरिकांनी या विनामूल्य स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

येत्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे. त्या निमित्ताने मनमाड शहरात शिवजयंतीनिमित्त गड किल्ले उभारणी स्पर्धेचे आयोजन नांदगाव मनमाड पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आले आहे. ‘चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या’ हे ब्रीद वाक्य घेऊन शिवजयंती निमित्त शिवरायांचे गड किल्ले मातीत बनविण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कारकीर्दीत स्वराज्यासाठी महाराष्ट्रभर विविध जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन गड किल्ले उभारले, गड किल्ले जिंकले त्यांची माहिती येणाऱ्या पिढीला व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी १७ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपली प्रवेशिका त्यात आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, शिवरायांचा कोणता किल्ला बनवणार त्याचे नाव यासह इतर माहिती असलेली प्रवेशिका पत्रकार उपाली परदेशी (9226727877), योगेश म्हस्के (8149888554), मिलिंद वाघ सर (9270885350) या क्रमांकावर पाठवायच्या आहेत. या स्पर्धेसाठी काही नियम अटी ठेवण्यात आल्या आहेत. स्वतःच्याच घरी पर्यावरण पूरक शिवरायांचे मातीचे गड किल्ले बनवण्याचे आहेत.
पर्यावरण पूरक गडकिल्ले मातीत बांधणे, छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांची प्रतिकृती सादर करावी, प्रवेश विनामूल्य असून प्रवेशिका १७ तारखेपर्यंत पाठवणे, नाव नोंदणी अनिवार्य आहे. परीक्षण २० फेब्रुवारी रोजी घरी जाऊन करण्यात येईल, बक्षीस वितरण शिवजयंती झाल्यानंतर करण्यात येईल, स्पर्धा शहर पातळीवर खुली राहील, परिक्षणाचे मुद्दे गट कार्य नियोजन, नावीन्य व कल्पकता, किल्ले विषयाची माहिती किल्ल्याची सुबकता असे असणार आहे. यशस्वी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि तीन उत्तेजनार्थ स्पर्धकांना आकर्षक सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते दिले जातील अशी माहिती नांदगांव मनमाड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे यांनी दिली.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.