Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

चला गड किल्ला बनवुया , मातीशी नाते जोडूया….नांदगाव-मनमाड पत्रकार संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्पर्धेचे आयोजन…..

Feb 17, 2023

मनमाड :  ‘चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या’ हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती निमित्त नांदगांव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने शिवरायांच्या गड किल्ल्यांची प्रतिकृतीचे मातीचे किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित केली असून मनमाड शहरातील नागरिकांनी या विनामूल्य स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

येत्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे. त्या निमित्ताने मनमाड शहरात शिवजयंतीनिमित्त गड किल्ले उभारणी स्पर्धेचे आयोजन नांदगाव मनमाड पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आले आहे. ‘चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या’ हे ब्रीद वाक्य घेऊन शिवजयंती निमित्त शिवरायांचे गड किल्ले मातीत बनविण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कारकीर्दीत स्वराज्यासाठी महाराष्ट्रभर विविध जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन गड किल्ले उभारले, गड किल्ले जिंकले त्यांची माहिती येणाऱ्या पिढीला व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी १७ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपली प्रवेशिका त्यात आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, शिवरायांचा कोणता किल्ला बनवणार त्याचे नाव यासह इतर माहिती असलेली प्रवेशिका पत्रकार उपाली परदेशी (9226727877), योगेश म्हस्के (8149888554), मिलिंद वाघ सर (9270885350) या क्रमांकावर पाठवायच्या आहेत. या स्पर्धेसाठी काही नियम अटी ठेवण्यात आल्या आहेत. स्वतःच्याच घरी पर्यावरण पूरक शिवरायांचे मातीचे गड किल्ले बनवण्याचे आहेत.
पर्यावरण पूरक गडकिल्ले मातीत बांधणे, छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांची प्रतिकृती सादर करावी, प्रवेश विनामूल्य असून प्रवेशिका १७ तारखेपर्यंत पाठवणे, नाव नोंदणी अनिवार्य आहे. परीक्षण २० फेब्रुवारी रोजी घरी जाऊन करण्यात येईल, बक्षीस वितरण शिवजयंती झाल्यानंतर करण्यात येईल, स्पर्धा शहर पातळीवर खुली राहील, परिक्षणाचे मुद्दे गट कार्य नियोजन, नावीन्य व कल्पकता, किल्ले विषयाची माहिती किल्ल्याची सुबकता असे असणार आहे. यशस्वी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि तीन उत्तेजनार्थ स्पर्धकांना आकर्षक सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते दिले जातील अशी माहिती नांदगांव मनमाड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे यांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

मराविमं अधिकारी संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर;अध्यक्षपदी प्रवीण बागूल, सरचिटणीसपदी संजय खाडे

मराविमं अधिकारी संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर;अध्यक्षपदी प्रवीण बागूल, सरचिटणीसपदी संजय खाडे

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे ४४ वे वार्षिक अधिवेशन पुणे येथे नुकतेच पार पडले....

read more
भय भ्रष्टाचार कॉपीमुक्त परीक्षा ही विद्यार्थी पालक शिक्षकांची नैतिक जबाबदारी अध्यापकभारतीच्या परिषदेत समुपदेशकांची चा सुर

भय भ्रष्टाचार कॉपीमुक्त परीक्षा ही विद्यार्थी पालक शिक्षकांची नैतिक जबाबदारी अध्यापकभारतीच्या परिषदेत समुपदेशकांची चा सुर

विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वर्षातील ज्ञानार्जन,ज्ञानप्राप्तीचे मूल्यमापन काही तासाच्या अत्यल्प...

read more
करंजवण – मनमाड पाणीपुरवठा योजनेला प्रकल्प समितीची मान्यता – आमदार कांदे यांच्या प्रयत्नांना यश

करंजवण – मनमाड पाणीपुरवठा योजनेला प्रकल्प समितीची मान्यता – आमदार कांदे यांच्या प्रयत्नांना यश

सुमारे चार दशकांपासून पाणीटंचाई ची झळ सोसणाऱ्या मनमाड करांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या करंजवण -...

read more
गुरुवारी नाशिकमध्ये कॉपी मुक्त परिक्षा परिषदेचे आयोजन – अध्यापक भारतीचा पुढाकार

गुरुवारी नाशिकमध्ये कॉपी मुक्त परिक्षा परिषदेचे आयोजन – अध्यापक भारतीचा पुढाकार

राष्ट्रीय बालक विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षण प्रशिक्षण संस्था अध्यापकभारती च्या वतीने उद्या दिनांक...

read more
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आमरण उपोषण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा लक्ष्मी नगर (वाडी) व मांडवड येथे जाहीर सत्कार

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आमरण उपोषण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा लक्ष्मी नगर (वाडी) व मांडवड येथे जाहीर सत्कार

मराठा समाजाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]