loader image
[ays_poll id=7]

कांदा निर्यात सुरू करून २००० प्रति क्विंटल हमीभाव मिळावा – मनमाडला महाविकास आघाडीचा रास्ता रोको

Feb 17, 2023

शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति क्विंटल २००० रुपये भाव द्यावा या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे व महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आज मार्केट समितीच्या गेट समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील एक शेतीप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. कांदा खरेदी-विक्रीसाठी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती महत्त्वाची बाजारपेठ असून, येथे विक्रीस येणाऱ्या एकूण आवकपैकी ८० ते ९० टक्के आवक ही कांद्याची होत असते. यावर्षी नाशिक, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांसह गुजरात. राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन झाल्याने देशांतर्गत कांद्याची मागणी कमी होत आहे. तसेच केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी धोरणाचा परिणाम म्हणून दिवसेंदिवस कांदा बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. दिवसेंदिवस कांद्याच्या बाजारभावात अशीच घसरण सुरू राहिल्याने केंद्र व राज्य शासनाच्या ध्येयधोरणांबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.

जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या प्राथमिक बाजारपेठ असल्याने येथे फक्त शेतकऱ्यांचाच शेतीमाल विक्रीस येतो. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणाऱ्या कांदा आवकेपैकी ६० ते ७० टक्के कांदा निर्यातयोग्य असतो. मात्र केंद्र व राज्य शासनाच्या कांदा निर्यातीबाबतच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही.

कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्याला प्रति एकरी ८० हजार रुपये खर्च येतो मात्र कांदा पिकाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्याचा किमान खर्चही मिळत नाही. कांदा पिकाला मिळणारा बाजारभाव व होणारा खर्च यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या हितार्थ तसेच कांदा पीकाला रु. २००० प्रति क्विंटल हमीभाव मिळावा व केंद्रसरकारने कांदा निर्यात सुरु करावी अशी मागणी करण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना माजी आमदार राजेंद्र देशमुख, संजय पवार, सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक, अल्ताफ खान,जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, संतोष बळीद, संतोष गुप्ता, माधव शेलार,दीपक गोगड, नाझिम शेख, सनी फसाटे, लियाकत शेख, भैया घुगे, यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

  मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए....

read more
शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

      मनमाड : येथील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धी क्लासेस...

read more
नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती  वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

संपूर्ण जगात सतत युद्ध जन्य परिस्थिती चे संकट असताना भारताचे शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी  निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.