loader image
[ays_poll id=7]

भूमी क्रिकेट संघाचा चाळीसगाव क्रिकेट संघावर विजय – रुषी शर्मा सामनावीर

Feb 18, 2023

शनिवार दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी भूमी क्रिकेट अकॅडमी मनमाड विरुध्द चाळीसगाव क्रिकेट अकॅडमी या संघामध्ये झालेल्या सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी संघाने आठ बळी राखुन विजय प्राप्त केला. ४० षटकांच्या या सामन्यामध्ये चाळीसगाव संघाने नाणेफेक जिंकुन फलंदाजी करण्याचे ठरवले. चाळीसगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना १८ षटकात १० बळी गमवुन फक्त १०२ धावा केल्या. ज्यात मनमाड संघातील रुषी शर्मा या गोलंदाजाने ५ बळी मिळविले. अभिजीतने ३ तर चिराग निफाडकर व ओम फासळे यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला. या धावांचा पाठलाग करत असताना मनमाड संघाने ८.५ षटकातच २ बळी गमवुन ह्या सामण्यात एक सहज विजय प्राप्त केला. मनमाड संघाच्या फलंदाजीत रोहित पवार नाबाद 38 धावा व हसन शेख यानी ही नाबाद 34 धावा फटकाविल्या. ५ षटकात गोलंदाजीत 12 धावा देऊन ५ बळी टिपणारा रुषी शर्मा सर्वोत्कृष्ठ गोलंदाज या सामण्याचा सामनावीर ठरला.

भूमी क्रिकेट अकॅडमी, मनमाड चे संचालक व कोच सिध्दार्थ ( भोला ) रोकडे व वाल्मिक रोकडे यांनी या सामण्याचे आयोजन महर्षी भगवान वाल्मिकी स्टेडियम मनमाड येथे केले.

अकॅडमीचे चे मार्गदर्शक श्री. ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक , हबीब शेख , सिद्धार्थ बरडीया , परवेज शेख , कौशल शर्मा , तय्यब शेख , शुभम ( बापु ) गायकवाड , शुभम बिडगर रोहित पवार यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान भाई मोमीन यांनी खेळाडुंना पुढिल सामण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन मनमाड शाखा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यकारिणी जाहीर

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन मनमाड शाखा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यकारिणी जाहीर

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची...

read more
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार दीपक  अस्वले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार दीपक अस्वले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे कारखाना शाखा चे जेष्ठ कार्यकर्ते व...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये नाकाद्वारे दिली जाणारी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये नाकाद्वारे दिली जाणारी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध

नाकाद्वारे देण्यात येणारी करोना प्रतिबंधक लस उपलब्ध 4 थेंबही पुरेसे : पहिला आणि बूस्टर डोस म्हणून...

read more
गोठ्यासाठीचे शासकीय अनुदान मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात लाच घेणाऱ्या चांदवड पंचायत समितीतील कंत्राटी अधिकारी एसीबी च्या जाळ्यात

गोठ्यासाठीचे शासकीय अनुदान मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात लाच घेणाऱ्या चांदवड पंचायत समितीतील कंत्राटी अधिकारी एसीबी च्या जाळ्यात

चांदवड पंचायत समितीतील कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (APO) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या...

read more
भा. ज.पा.महिला मोर्चा तर्फे महिला दिनानिमित्त मनमाड मधील कर्तृत्ववान महिलांना ‘सुषमा स्वराज’पुरस्कार प्रदान

भा. ज.पा.महिला मोर्चा तर्फे महिला दिनानिमित्त मनमाड मधील कर्तृत्ववान महिलांना ‘सुषमा स्वराज’पुरस्कार प्रदान

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा मनमाड मंडल, तर्फे महिला दिनानिमित्त मनमाड मधील कर्तृत्ववान...

read more
.