Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय असंवैधानिक – माधव शेलार

Feb 18, 2023

मनमाड – निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात मनमाड शहर शिवसेना ( ठाकरे गट) शहरप्रमुख माधव शेलार यांनी पत्रक प्रसिद्ध करत निवडणूक आयोगाचा निर्णय हा असवैधानिक असल्याचे म्हटले आहे. दि. १७ फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले हे कृत्य कोणत्याही आधारे कायदेशीर नाही. निवडणूक आयोगाने वेळोवेळी मागितलेली माहिती व पुरावे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सादर केली आहे. तरी देखील त्याचा काही एक विचार न करता सत्ताधारी पक्षाच्या दबावापोटी एकतर्फी निर्णय देण्यात आला. यावरून हे सिद्ध होते की या देशात संविधानाला न मानणारा एक घटक तयार झाला आहे व देश हळूहळू गुलामगिरी कडे झुकत चालला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बहाल करण्याचे वेळेस असे उदगार काढले होते की, अथक प्रयत्न करन जे संविधान लिहीलेले आहे ते लोकहितासाठी आहे, परंतु सरकार बेजबाबदार असेल तर या संविधानाला कुठलाही अर्थ राहणार नाही व देश पुन्हा गुलामगीरीत जाईल. सद्यस्थितीत तेच घडताना दिसत आहे. संविधानाचा योग्य प्रकारे पालन होतांना दिसत नाही. आय.टी,सि.बी.आय, ईडी आणि केंद्रीय निवडणूक आयोग या सर्व यंत्रणा केंद्र सरकारच्या इशा-यावर चालत आहे. असेच चालत राहिले तर पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा लढा उभारावा लागेल, मी नांदगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांना आश्वासित करू इच्छितो की यामुळे घाबरून जाण्याची खचून जाण्याची गरज नाही. कारण आपण सर्व हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे कडवट शिवसैनिक आहोत व कोणत्याही बिकट परिस्थितीत पक्षप्रमुख उदय बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणारे शिवसैनिक आहोत, जो घाबरला तो शिवसैनिकच नाही. कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही हे ब्रीदवाक्य ही घोषणा शिवसेनेचीच आहे. ठाकरेशाही इतक्यात संपणारी नाही तर हा एक उगवता सूर्य आहे.जसे आकाशातील सूर्यशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे, तसेच महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे व त्यांचे वंशज उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या शिवाय पर्याय नाही. आजच्या परिवर्तीत एकच सांगू इच्छितो की सत्य परेशान हो सकता है। लेकीन, कभी पराजित नहीं हो सकता है।

सत्येचा न्याय हक्काचा लढा संविधानिक मार्गाने उभारण्याची गरज आहे आणि येणाऱ्या काळात लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्र एकवटल्याशीवाय राहणार नाही. विजय हा सत्यात होईल. समुद्राला घाबरणारी नाव (होडी) कधीही किनारा गाठत नाही. आणि प्रयत्न करणा- याला अपयश येत नाही.

खंबीर, कणखर, स्वाभीमानी नेतृत्व म्हणजेच उध्दव बाळासाहेब ठाकरे सत्य मेव जयते॥ जय महाराष्ट्र ॥

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

  मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए....

read more
शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

      मनमाड : येथील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धी क्लासेस...

read more
नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती  वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

संपूर्ण जगात सतत युद्ध जन्य परिस्थिती चे संकट असताना भारताचे शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी  निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
जय भवानी व्यायामशाळेच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

जय भवानी व्यायामशाळेच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

आज नाशिक येथे संपन्न झालेल्या नाशिक विभागीय (नाशिक जळगाव धुळे नंदुरबार)शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]