loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

Feb 22, 2023


मनमाड : अकृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारासमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या कर्मचाऱ्यांनी १२ वी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय देसले यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सोमवारी (दि. २०) पासून निदर्शने, कामबंद आंदोलन केल्यानंतरही मागण्यांची पूर्तता झालेली नसल्यामुळे बेमुदत संपाला सुरुवात करण्यात आली आहे. सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनरुज्जीवित करून सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ववत लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०, २०, ३० वर्षांनंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावी, सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या एक हजार ४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झालेल्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करावी, तसेच विद्यापीठ, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास मान्यता द्यावी, अशा विविध मागण्या असून, या आंदोलनात येथील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रशांत सानप, चंद्रशेखर गाणी, उमेश भोये, हेमचंद्र आडसुळे, कैलास शिंदे, अशोक सोनवणे, बापू ताडगे, किशोर आहेर आदींसह सर्व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
.