loader image
[ays_poll id=7]

मनमाड कबड्डी प्रीमियर लीग – 2 ला सुरुवात – आय.बी.एम.ची विजयी सलामी

Feb 22, 2023


मनमाड – नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व मनमाड कबड्डी क्रीडा समिती आयोजित मनमाड प्रीमियर लीग – 2 ची सुरुवात आज सायंकाळी सहा वाजता महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल मनमाड येथे, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष माजी नगराध्यक्ष श्री. राजाभाऊ पगारे यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी पंकज खताळ फाउंडेशनचे प्रमुख पंकज खताळ व त्यांच्या सौभाग्यवती सु चेता खताळ, तसेच नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाहक मोहन अण्णा गायकवाड, माजी आमदार जगन्नाथ रावजी धात्रक, साईनाथ भाऊ गिडगे, मनमाड शिवसेनाप्रमुख मयूर भाऊ बोरसे नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी या कबड्डी प्रीमियर साठी उपस्थित होते. या सामन्याचे प्रस्ताविक रमेश केदार यांनी केले. प्रथम सामना चैतन्य वॉरियर्स विरुद्ध आय बी एम स्टार यांच्या झाला या सामन्यांमध्ये मध्यंतरापर्यंत चैतन्य रायडर्स मिळवलेले गुण 10 व आयबीएम स्टार या संघाने मिळवलेले गुण 18 मध्यंतरापर्यंत आयबीएम स्टार या संघाकडे आठ गुणांची आघाडी होती. सामन्याच्या शेवटी आयबीएम स्टार या संघाने 39 गुण मिळविले तसेच या संघाने 28 गुण मिळविले सदर सामन्याचा निकाल आयबीएम स्टार हा संघ अकरा गुणांनी विजयी झाला सदरहू सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून भूषण दरगुडे आयबीएम स्टार या खेळाडूची निवड करण्यात आली. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन या सामन्यामध्ये सामनाधिकारी म्हणून विलास मोरे, पंच दत्तू जाधव, रहमान शेख, गुणलेखक म्हणून राजू डमरे यांनी काम पाहिले.


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
.