loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुका कृषी विभाग प्रक्षेत्रावर शासकीय फळ रोपवाटीकेस मंजूरी

Feb 24, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुका कृषी विभाग नांदगाव प्रक्षेत्रावर शासकीय फळ रोपवाटिका स्थापन करण्यास मान्यता आ . सुहास कांदे यांच्या प्रयत्नाना यश

नांदगाव तालुका कृषी विभागाच्या प्रक्षेत्रावर शासकीय फळ रोपवाटिका प्रस्तावित करण्यासाठी आ. सुहास कांदे यांच्या कडून पाठपुरावा करण्यात आला होता.
फळ रोपवाटिका क्षेत्र मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना आंबा कलमे डाळिंब कलमे इत्यादी फळझाडांचे कलमे रोपे उपलब्ध होणार असून यासाठी आता तालुका किंवा जिल्हा बाहेर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. शिवाय फळझाडांची लागवड क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.
भविष्यात शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण, शेती प्रशिक्षण गृह प्रस्तावित करण्यात येत आहे त्यामुळे शासकीय पद्धतीने उत्पादन वाढ करण्यासाठी मदत होईल.
तालुका बीज गुणन केंद्र नांदगाव या प्रक्षेत्रावर अंशतः रूपांतर करून शासकीय फळ रोपवाटिका स्थापन करणे मान्यता मिळणे बाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागा कडून शासन निर्णय काढण्यात आला आहे.
तालुका बीज गुनन केंद्र नांदगाव या प्रक्षेत्रावर अंशतः रूपांतर करून शासकीय फळ रोपवाटिका स्थापन करणे बाबतचा प्रस्ताव विभागीय कृषी सहसंचालक नाशिक यांच्याकडून प्राप्त झाला आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड विषयाचा आढावा घेताना कलमी रोपे उपलब्ध न झाल्यामुळे प्रशासकीय मान्यता दिलेल्या क्षेत्रांपैकी कमी क्षेत्राची लागवड झाल्याचे दिसून आले आहे त्याकरिता भविष्यात कलमे रोपांची उपलब्धता होण्यासाठी तालुका बीजगुणन केंद्र नांदगाव येथील प्रक्षेत्राचे रोपवाटिकेत रूपांतर करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी दिली आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.