loader image
[ays_poll id=7]

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघ आयोजित ‘मातीचे गड-किल्ले बनवणे’ स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद….स्पर्धेचे उद्या रविवारी होणार निकाल जाहीर

Feb 25, 2023


मनमाड : योगेश म्हस्के – महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा झाली , याच दिनाचं औचित्य साधुन नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वराज्यातील मातीचे गड-किल्ले बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत शहरातील तब्बल 40 लहान -मोठ्या स्पर्धकांनी प्रत्यक्ष आपला सहभाग नोंदवला , आपल्या महाराष्ट्रात किल्ल्यांना एक आगळेवेगळे स्थान आहे. हे ऐतिहासिक किल्ले आपल्या महाराजांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देतात. लहान मुलांमध्ये किल्ल्यांविषयी व इतिहासाविषयी माहिती व्हावी या हेतूने शिवजयंतीच्या निमित्ताने शहर पातळीवर मातीचे किल्ले बनविण्याचे स्पर्धेचे आयोजन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले होते. किल्ले बांधणीतून छत्रपती शिवाजी महाराज, सहकारी मावळे, स्वराज्य आणि महाराष्ट्राचा मराठमोळय़ा इतिहास संस्कृतीची आठवण जागृत होते. या किल्ला स्पर्धेत, प्रामुख्याने किल्ले प्रतापगड , रायगड , शिवनेरी, सिंहगड , तोरणागड , जंजिरा इत्यादी किल्यांच्या उत्तम प्रतिकृती स्पर्धकांनी प्रत्यक्ष साकारल्या होत्या .छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण तसेच महाराजांनी कसे स्वराज्य निर्माण केले याची कल्पना ठेवावी व येणाऱ्या पिढीला त्याची पूर्ण माहिती मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. 26/2/2023 रोजी सायंकाळी 5 वाजता , महात्मा फुले वाचनालय आणि अभ्यासिका, आय.यु.डी.पी. , मनमाड येथे प्रमुख मान्यवर , सहभागी स्पर्धक आणि नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.