loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडी व व्याख्यान संपन्न

Feb 27, 2023


मराठी भाषेत निर्माण झालेले साहित्य हे आजवर भाषेच्या गोडव्याने आणि त्यातील लहेजाने वाङ्मयाच्या रूपाने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचले आहे .मराठी भाषा केवळ समृध्दच नाही तर आगामी काळात तिची ज्ञानभाषा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी शासन आणि मायबोलीवर प्रेम करणारे समस्त मराठी प्रेमी लोक यांनी एकत्र येऊन मराठीला ज्ञानभाषा करण्याचा संकल्प कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी करूया ,असे आवाहन महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाडचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी केले.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक तात्यासाहेब शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मनमाड महाविद्यालयात मराठी विभाग तसेच महाविद्यालयाचा ग्रंथालय विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी डॉ. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. शेंडगे प्रा.डॉ. मिलिंद अहिरे, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. युवराज भामरे प्रा. अमर ठोंबरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. डॉ.पवनसिंग परदेशी , ग्रंथपाल राहुल लोखंडे , शिंदे सर ,आदी यावेळी उपस्थित होते.डॉ.पाटील पुढे म्हणाले की’मराठी भाषा समृद्ध असूनही अनेक वर्षांपासून तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकला नाही ही खंत आहे . मराठीत इतके दर्जेदार साहित्यिक असून तिला वैभवशाली अशी संत परंपरा लाभलेली आहे. याशिवाय मराठीत लेखन करणारे उदयोन्मुख साहित्यिक यांनी देखील मराठी साहित्य समृद्ध केले आहे, आणि करत आहेत. परंतु अभिजात भाषेचा दर्जा मराठीला अजून मिळू शकला नाही .या पुढील काळात तरी तो मिळावा , यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. डॉ. पाटील यांनी यावेळी त्यांचा स्वित्झर्लंडमधील एक प्रसंग सांगितला. ते स्वित्झर्लंडला गेले असताना त्यांना तिथे एक मराठी भाषिक व्यक्ती आढळला. त्याचे आडनाव देशमुख होते. आणि प्राचार्य पाटील यांनी त्यांना ओळख करून देताना आपणही महाराष्ट्रीयन असल्याचे सांगितले. आणि आपले आडनाव पाटील असल्याचे सांगितले. त्यावेळी कुठलाही संबंध नसताना केवळ मराठी भाषिक आहेत म्हणून त्या माणसाने प्राचार्य पाटील यांना कडकडून मिठी मारली. हे मराठीचे वेगळेपण सांगताना उपस्थितांना गहिवरून आले. मराठी भाषा गौरव दिनाची सुरुवात महाविद्यालयातून ग्रंथ दिंडी काढून करण्यात आली. यावेळी परिसरातील वारकरी संप्रदायातील पंढरपूरला आषाढी, कार्तिकीला वारी करणारे वारकरी गुणिजन, गायक वादक यांनी टाळ मृदंगाच्या ठेक्यात ,ग्रंथ दिंडीत सहभाग घेतला. मनमाड शहरातून ग्रंथ दिंडीला विद्यार्थी, व विद्यार्थीनीनि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ज्ञानोबा तुकोबांचे अभंग म्हणणाऱ्या ग्रंथ दिंडीने परिसरातील लोकांचे लक्ष वेधले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पवनसिंग परदेशी यांनी केले .तसेच डॉ. युवराज भामरे प्रा. अमर ठोंबरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी पूजा पिंगट तनिषा राऊत यांनी सूत्रसंचालन केले मराठी भाषा गौरव दिन असल्याने सर्व विद्यार्थिनींनी पारंपारिक साडी परिधान करून ग्रंथदिंडीत सहभाग नोंदवला.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – लासलगाव येथे सराफी दुकानात भरदिवसा तीन तोळ्याची पोत चोरण्याचा प्रयत्न

बघा व्हिडिओ – लासलगाव येथे सराफी दुकानात भरदिवसा तीन तोळ्याची पोत चोरण्याचा प्रयत्न

लासलगाव ( ठिणगी वृत्तसेवा ) लासलगाव शहरातील मेनरोड वरील अत्यंत वर्दळ असलेल्या ठिकाणी एका नामांकित...

read more
बी जी दरगुडे पब्लिक स्कूल मनमाड येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

बी जी दरगुडे पब्लिक स्कूल मनमाड येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

मनमाड - मनमाड येथील बी जी दरगुडे  पब्लिक स्कूलच्या शालेय परिसरात भव्य स्टेज व मंडप व्यासपीठ सजावट...

read more
वीज वितरण कंपनीने दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील जनतेला सहकार्य करावे – शिवसेना ठाकरे गटाची मागणी

वीज वितरण कंपनीने दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील जनतेला सहकार्य करावे – शिवसेना ठाकरे गटाची मागणी

मनमाड - नांदगाव मतदार संघ व मनमाड शहर व ग्रामिण भागात दुष्काळी परिस्थती असल्यामुळे सर्वत्र शेतकरी...

read more
बघा व्हिडिओ : नांदगाव मनमाड सह ग्रामीण भागात गारपिटीने पिकांची हानी: भीषण पाणी टंचाईने होरपळणाऱ्या तालुका वासीयाना अस्मानी तडाखा

बघा व्हिडिओ : नांदगाव मनमाड सह ग्रामीण भागात गारपिटीने पिकांची हानी: भीषण पाणी टंचाईने होरपळणाऱ्या तालुका वासीयाना अस्मानी तडाखा

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरीक जोरदार पावसाची अपेक्षा...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 28/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 28/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
.