loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आटोपून परततांना विद्यार्थ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात – २२ विद्यार्थी जखमी

Feb 27, 2023

अमरावतीत राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या शिबिरातून परतत असलेल्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या ट्रॅक्‍टरला अपघात झाला. ट्रॉली उलटल्‍याने २२ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने दर्यापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा थरार मोबाईल कॅमेरात चित्रित झाला आहे.
दर्यापूर येथील जे. डी. पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर आटोपून विद्यार्थी ट्रॅक्टरने परतत होते. अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली आहे. सध्या पोलीस रुग्णालयात दाखल झाले आहेत.

दर्यापूर तालुक्‍यातील जैनपूर येथे राष्ट्रीय सेवा शिबीर सुरू होते. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या शिबिराचा आज शेवटचा दिवस होता. शिबीर संपल्यानंतर सर्व विद्यार्थी कॉलेजच्यावतीने भाड्याने घेतलेल्या ट्रॅक्टरमधून दर्यापूरकडे निघाले होते. जैनपूर नजीक वळणावर ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॉली उलटली. या अपघातात सुमारे २२ विद्यार्थी हे गंभीर जखमी झालेले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले. मात्र काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आता तातडीने अमरावती येथे हलविण्यात आले आहे. रुग्‍णालयात विद्यार्थ्यांच्‍या नातेवाईकांनी गर्दी केली. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अजून बातम्या वाचा..

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.