Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सर्व सामान्यांना होळी पूर्वीच महागाईचा चटका – घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागले

Mar 1, 2023

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.
14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.
8 महिन्यांनंतर घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या असून यापूर्वी 1 जुलै रोजी घरगुती सिलेंडरच्या किमतींत वाढ झाली होती. त्यामुळे गेल्या वेळी जुलैमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र स्थिर होत्या. आज घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलेंडर्सच्या दरांत वाढ करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाडच्या विद्यार्थ्यांची खेलो इंडिया विद्यापीठ व आखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्तरावर झेप

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाडच्या विद्यार्थ्यांची खेलो इंडिया विद्यापीठ व आखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्तरावर झेप

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ दरम्यान आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूर येथे दिनांक नुकत्याच पार पडलेल्या...

read more
पानेवाडी इंधन प्रकल्पातील वातानुकूलित कक्षाला आग ; वेळीच आटोक्यात आल्याने अनर्थ टळला

पानेवाडी इंधन प्रकल्पातील वातानुकूलित कक्षाला आग ; वेळीच आटोक्यात आल्याने अनर्थ टळला

शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या मनमाड नांदगाव रोड वरील पानेवाडी आणि धोटाणे शिवारात इंधन आणि...

read more
पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने सर्व मशिदिंमध्ये पाणी उपलब्ध करून द्यावे : फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे फिरोज शेख यांची मागणी

पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने सर्व मशिदिंमध्ये पाणी उपलब्ध करून द्यावे : फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे फिरोज शेख यांची मागणी

मनमाड: मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून लहान लहान मुलांपासून तर अनेक वयोवृद्ध...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]