Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सर्व सामान्यांना होळी पूर्वीच महागाईचा चटका – घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागले

Mar 1, 2023

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.
14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.
8 महिन्यांनंतर घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या असून यापूर्वी 1 जुलै रोजी घरगुती सिलेंडरच्या किमतींत वाढ झाली होती. त्यामुळे गेल्या वेळी जुलैमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र स्थिर होत्या. आज घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलेंडर्सच्या दरांत वाढ करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

शेअर बाजार गडगडला

शेअर बाजार गडगडला

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज गुरुवारी सकाळी युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे सावकारी पध्दतीने वीज बिल वसूली करणाऱ्या वीज वितरण कंपनी विरोधात आंदोलनाचा इशारा

मनमाड शहर भाजपा तर्फे सावकारी पध्दतीने वीज बिल वसूली करणाऱ्या वीज वितरण कंपनी विरोधात आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरात वीज वितरण कंपनी द्वारे गेल्या दोन दिवसांत वीज ग्राहकांन कडून सावकारी पध्दतीने वीज बिल...

read more
रोटरी क्लब व भूमी क्रिकेट क्लब आयोजीत अंडर 17 बॉक्स टर्फ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

रोटरी क्लब व भूमी क्रिकेट क्लब आयोजीत अंडर 17 बॉक्स टर्फ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

बुधवार २३ फेब्रुवारी रोजी येथील रोटरी क्लब मनमाड आणि भूमी क्रिकेट क्लबच्या संयुक्त विद्यमाने मनमाड...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]