Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सर्व सामान्यांना होळी पूर्वीच महागाईचा चटका – घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागले

Mar 1, 2023

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.
14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.
8 महिन्यांनंतर घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या असून यापूर्वी 1 जुलै रोजी घरगुती सिलेंडरच्या किमतींत वाढ झाली होती. त्यामुळे गेल्या वेळी जुलैमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र स्थिर होत्या. आज घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलेंडर्सच्या दरांत वाढ करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

मा.आमदार अनिलदादा आहेर ह्यांच्या निवासस्थानी श्री.निलेश लंके साहेब व श्री.सुधीरजी तांबे साहेब यांची सदिच्छा भेट

मा.आमदार अनिलदादा आहेर ह्यांच्या निवासस्थानी श्री.निलेश लंके साहेब व श्री.सुधीरजी तांबे साहेब यांची सदिच्छा भेट

नांदगाव येथे मा.आमदार अनिलदादा आहेर यांच्या निवासस्थानी आमदार श्री.निलेश लंके साहेब व श्री.सुधीरजी...

read more
मागासवर्गीय रेल्वे कामगार वर्धापनदिननिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मागासवर्गीय रेल्वे कामगार वर्धापनदिननिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाड येथे १२,१३फेब्रुवारी १९३८ रोजी भव्य मागासवर्गीय रेल्वे कामगार...

read more
कर्नाटक येथील घटनेचा मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने निवेदनद्वारे निषेध व न्यायालयीन चौकशीची मागणी

कर्नाटक येथील घटनेचा मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने निवेदनद्वारे निषेध व न्यायालयीन चौकशीची मागणी

मनमाड शहर शिवसेनेतर्फे भारताचे महामहीम राष्ट्रपती यांना एक निवेदन देण्यात आले त्याद्वारे कर्नाटक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]