loader image

मनमाड नगर परिषदेत ३६००० ची लाच स्वीकारणाऱ्या त्रिकुटाला एसीबी ने केली अटक – मनमाड शहरात खळबळ

Mar 3, 2023


लाचेची मागणी 36,000/-रु.दि.02/ 03/2023

लाच स्विकारली 36,000/-रु. दि.03/03/2023

हस्तगत रक्कम 36,000/ रुपये.

तक्रारदार कंत्राटदार वय वर्षे ५२ ह्यांनी केलेल्या कामाचे कन्स्ट्रक्शन फर्म चे बिल नगरपरिषद कार्यालय मनमाड येथे जमा करण्यात आलेले होते. संबंधित कामाच्या बिलाचा चेक तयार करून चेक काढून दिल्याच्या मोबदल्यात मनमाड नगर पालिकेतील लेखा विभागातील वरिष्ठ लिपिक आनंद प्रभाकर औटी, वय ४६ वर्षे, संजय बबन आरोटे,वय ५२ वर्षे, रोखपाल, लेखा विभाग मनमाड नगर परिषद आणि नंदू पंडित म्हस्के,वय ५८ वर्षे,शिपाई यांनी टक्केवारीनुसार 36,000/- रुपये लाचेची मागणी करून आज दिनांक 3/03/ 2023 रोजी 36,000/- रुपये लाचेची रक्कम तक्रारदार यांचे कडून स्वीकारली असून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत
ह्या कारवाईत सापळा अधिकारी
अनिल बागुल, पोलीस निरीक्षक , अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक
सापळा पथक
पो. ना. किरण अहिरराव
पो. ना.अजय गरूड
चा. पो ना. परशुराम जाधव.
सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नाशिक यांनी यशस्वीरीत्या लाच स्वीकारणाऱ्या मनमाड नगरपरिषदेत अधिकारी यांना रंगेहाथ पकडले.
मा.सौ.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर साो,
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनात सदरील कार्यवाही करण्यात आली.
आरोपीचे सक्षम अधिकारी
मा. मुख्याधिकारी. जिल्हा परिषद, नाशिक.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा असे आवाहन
अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

.