loader image
[ays_poll id=7]

कविता राऊत, दत्तू भोकनळ आणि अंजना ठमके या खेळाडूंची होणार शासकीय सेवेत थेट नियुक्ती – गिरीश महाजन

Mar 5, 2023

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचा नावलौकिक वाढवून देशासाठी पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना शासकीय नोकरीत सामावून घेतले जात नसल्याचा मुद्दा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी विधीमंडळाच्या सभागृहात उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देत क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकचे खेळाडू कविता राऊत, दत्तू भोकनळ, अंजना ठमके यांना दोन महिन्यात ‘क्लास वन’ नोकरीत सामावून घेतले जाईल, असे आश्वासन दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ या विषयावर विधीमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. राज्य शासनाकडून या खेळाडूंची उपेक्षा होत असून त्यांना नोकरीचे आश्वासन दिले असल्याने शासनाच्या सेवेत त्यांना समाविष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली होती.
आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत, दत्तू भोकनळ व अंजना ठमके या खेळाडूंचा महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान केला आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार सुद्धा २०२० मध्ये दत्तू भोकनळ यांना मिळाला आहे.

३० एप्रिल २००५ च्या शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. १ मे २०११ च्या शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंसाठी शासकीय सेवेत थेट नियुक्तीची मानके देखील निश्चित केलेली आहेत.
या खेळाडूंनी हे निकष पूर्ण केलेले असताना त्यांना अद्याप शासकीय नोकरी का मिळाली नाही, असा मुद्दा माजी मंत्री भुजबळांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना क्रीडामंत्री महाजन म्हणाले, नवीन क्रीडा धोरणानुसार या खेळाडूंना ‘क्लास वन’ अधिकारी म्हणून शासकीय सेवेत सामावून घेतले जाईल, असे आश्वासन दिले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार...

read more
भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने मतदार संघातील जिल्हा परिषद...

read more
गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

मनमाड - मनमाड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप कुलकर्णी यांचे चिरंजीव मनमाड चे भूमिपुत्र डॉ. तन्मय...

read more
मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

  मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने...

read more
विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

विजय करंजकरांचा अखेर उबाठा गटाला जय महाराष्ट्र – समर्थकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

मनमाड - उबाठा गटाचे नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी काल रात्री अनेक पदाधिकाऱ्यांसह...

read more
.