Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचा दिलासा – इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळणार गुण

Mar 5, 2023

सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या पेपरमधील त्रुटींबाबत महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील संबंधित त्रुटी असलेला प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नाचे दोन याप्रमाणे एकूण सहा गुण देण्यात येणार असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे.
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर होता. या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत कवितेवर आधारित प्रश्नात ए-३ आणि ए-५ क्रमांकाचे प्रश्न राज्य मंडळाकडून छापण्यात आले नव्हते, तर ए-४ क्रमांकाचा प्रश्न विचारण्याऐवजी तेथे उत्तर छापण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या छपाईतील चुकीबाबत राज्य मंडळाने यापूर्वीच दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान, पेपरमधील त्रुटींबाबत नियामक मंडळाच्या अहवालानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे राज्य मंडळाने जाहीर केले. परंतु कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या बहिष्कारामुळे नियामक मंडळाची बैठक गेल्या ११ दिवसांत होऊ शकली नाही.

शिक्षणमंत्र्यांसमवेत गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार मागे घेतला. त्यानंतर इंग्रजी विषयाच्या पेपरबाबत प्रमुख नियामकांची सभा घेण्यात आली.

इंग्रजी प्रश्नपत्रिकेमध्ये त्रुटी, चुका असल्याचे इंग्रजी विषयाच्या संयुक्त सभेच्या अहवालावरून निदर्शनास आले. त्रुटी असलेल्या प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने देण्याचे, याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे स्पष्ट केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीच्या पालखी  विसर्जन मिरवणुकीत व्यसन मुक्तीचा सामाजिक संदेश

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीच्या पालखी विसर्जन मिरवणुकीत व्यसन मुक्तीचा सामाजिक संदेश

    मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व सार्वजनिक गणेश उत्सवातील प्रथम मानाचा...

read more
बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
नांदगाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाची दाहकता – आमदार कांदेंच्या पाठपुराव्याला यश ‘ट्रिगर १’ लागू

नांदगाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाची दाहकता – आमदार कांदेंच्या पाठपुराव्याला यश ‘ट्रिगर १’ लागू

नांदगाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाची दाहकता - आमदार कांदेंच्या पाठपुराव्याला यश 'ट्रिगर १' लागू...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]