loader image
[ays_poll id=7]

नांदगावला फारकत कादंबरीचे प्रकाशन

Mar 7, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

आपल्या भावना शब्दरुपात मांडण्याची कला फार कमी लोकांना जमते. परंतु बाबुराव मानकरी यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर आपल्या भावनांना शब्दरूप देऊन फारकत ही कौटुंबिक समस्येवर आधारीत व दुसऱ्यांना बोध घेणारी सुंदर अशी कादंबरीची निर्मिती केली.त्यांचे कौतुक केले पाहिजे. ही कादंबरी साकारतांना त्यांच्या सौभाग्यवतींचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. त्यांच्या भावनांना वाट करून द्यायला मित्रपरिवार व कुटुंबातील सदस्यांच्या सहभाग आहे. फारकत कादंबरीतील अनुभव वाचून वाचकांनी सकारात्मक दृष्टिकोन जोपासला पाहिजे असे पुस्तकातील व्यक्त होते. असे प्रतिपादन नांदगावचे तहसीलदार डॉ सिध्दार्थ मोरे यांनी केले. कृष्णाई लाॅन्स हनुमान नगर येथे बाबुराव मानकरी यांच्या फारकत कादंबरीचे प्रकाशन तहसीलदार डॉ सिध्दार्थ मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी, गीतकार व मुखपृष्ठकार विष्णू थोरे, शिवसेना महिला तालुका प्रमुख रोहिणी ताई मोरे,माजी नगरसेवक बालीकाका कवडे, सिध्दी प्रकाशनचे प्रकाशक ,लेखक,कवी संदीप देशपांडे, नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र लातुरचे संचालक अरुणकुमार गवळे, नांदगावचे ए.पी.आय.दिलीप सुरवाडकर, श्याम मोरे, ईगल कन्स्ट्रक्शनचे इंजिनिअर रंजनजी, साहित्य परिषद शाखा नांदगावचे अध्यक्ष प्रा.सुरेश नारायणे, कवयत्री प्रतिभा खैरनार, प्रकाश शिंदे, भारतीताई बागोरे, राजाराम गवांदे, जेष्ठ पत्रकार सुरेश शेळके, संजीव निकम, गिरणानगर ग्रामपंचायत सदस्य ॳॅड.उमेश सरोदे, राजेंद्र कुटे,सचिन आहेर, योगेश दळवी ,राजाराम गवांदे , लेखक बाबुराव मानकरी, सौ मानकरी, आदी मान्यवर उपस्थित होते.

बाबुराव मानकरी यांनी प्रथम प्रयत्नात लिहीलेली कादंबरी नक्कीच वाचनीय आहे.साध्या सरळ भाषेत विषय मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.आज समाजात फारकत ही एक भयावह समस्या निर्माण झाली आहे. साध्या-साध्या गोष्टी पती-पत्नीत वादावादी टोकाला जातात. त्या होऊ नये यासाठी कुटुंबाने प्रयत्नशील असावे या बाबतचा संदेश बाबुराव मानकरी यांच्या कादंबरीतुन दिसुन येते. असे प्रतिपादन प्रा.सुरेश नारायणे यांनी पुस्तकांचा परिचय करून देताना सांगितले. मानकरी यांनी संयमाने व जिद्दीने पुस्तकांची निर्मिती केली. याचा मोठा आनंद आहे. त्यांनी वास्तववादी विचार मांडून कादंबरी चे लिखान केले आहे. अनुभवांवर आधारित त्यांचे पुस्तक वाचकांना नक्कीच आवडेल. असे प्रतिपादन सिध्दी प्रकाशनचे प्रकाशक संदिप देशपांडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले. तर पुस्तक लिखनाबाबत लेखक बाबुराव मानकरी यांनी कादंबरी लाखांचा उद्देश त्यांच्या मनोगतातुन व्यक्त केला. आज कुटुंबातील संवाद हरवला आहे. वेगवेगळ्या कारणांनी कुटुंबातील नात्यात कटुता येते. नात्यातील दुरावा वाढला की त्यातुन फारकती सारख्या गोष्टी वाढत चालल्या आहे. यात समन्वय साधण्याचा प्रयत्न झाला पाहिजे या विचारातुनच लेखकाने फारकत कादंबरीचे लिखान केले आहे त्यांच्या कादंबरीचे मुखपृष्ठ करण्याची संधी मिळाली व मानकरी परिवाराचा स्नेह वृद्धिंगत करण्याचा योग आला याचा आनंद वाटतो असे कवी , गीतकार,व मुखपृष्ठ कार विष्णू थोरे मनोगतात म्हणाले. नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र लातुरचे संचालक अरुणकुमार गवळे साहेब यांनीही मनोगत व्यक्त केले व मानकरी यांच्या कादंबरी लिखाणास शुभेच्छा दिल्या. डॉ.मुकेश मानकरी यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा.सुरेश नारायणे यांनी करुन दिला. सुत्रसंचलन ॳॅड.विद्या कसबे यांनी केले. आभार सौ.माया गवळे यांनी मानले.बळवंत वाकोडे, अनिल बुरकुल, संदिप मानकरी, नितीन आंबेकर,दिपक त्रिभुवन,सोनु वाकोडे, राजेश कापसे, रविंद्र निकम, आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले


अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.