loader image
[ays_poll id=7]

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, नांदगाव तर्फे आज नाशकात वस्त्र त्याग आंदोलन – नांदगाव तालुका पतसंस्था फेडरेशन ने दिला पाठिंबा

Mar 8, 2023

मनमाड – नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँके कडे अडकून पडलेल्या विविध संस्था आणि पतसंस्थांच्या कित्येक कोटींच्या रकमा बँक परत करत नसून आज पासून भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास नांदगाव तर्फे नाशिक येथे वस्त्र त्याग आंदोलन करण्यात येणार आहे.ह्या आंदोलनाला नांदगाव तालुका पतसंस्था फेडरेशन ने पाठिंबा दिला असून तसे पत्र फेडरेशन चे प्रदीप बोगावत आणि हेमंत गवळे यांनी तालुका सचिव भास्कर झा यांनी दिले. नोट बंदीच्या कालावधी पासून, नांदगाव तालुक्यातील बहुतांशी पतसंस्थांच्या कित्येक कोटी रुपयांच्या ठेवी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकून पडल्या आहेत.

वेळोवेळी ठेवी परत करण्याची/ खात्यातील शिल्लक रकमेची मागणी करूनही बँकेकडून ठेवी परत केल्या जात नाहीत. तसेच ठेवींचे बळजबरीने नुतनीकरण करण्यास भाग पाडले गेले आहे.

सदरहू ठेवी/ बँकेतील शिल्लक रकमा परत मिळाव्या म्हणून वेळोवेळी विविध संघटनांनी/ फेडेरेशननेही आंदोलने केलीत, तरी देखील आश्वासनांशिवाय कुठलीही ठोस पूर्तता केलेली नाही. पतसंस्थांच्या ठेवीदारांनी मोठ्या विश्वासाने आपल्या ठेवी पतसंस्थांत गुंतवलेल्या आहेत, परंतु नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ठेव परत केली नसल्याकारणाने पतसंस्थांचे खेळते भांडवल मोठ्या प्रमाणात अडकून पडले आहे.

पतसंस्थांच्या ठेवीदारांनी आपल्या ठेवींची मागणी अचानक केल्यास पतसंस्था ठेवी परत करू शकणार
नाहीत.

ठेवीदारांच्या ठेवी परत न दिल्याने ठेवीदारांचा बांध सुटल्यास तालुकाभर जनक्षोभ उसळू शकतो त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण होऊन मोठा हिंसाचार संभवतो, तसेच संस्थांची व संस्था चालकांची जीवित अथवा वित्त हानी होऊ शकते हे केवळ नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठेवी वेळेवर परत न केल्यामुळे घडू शकते.

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास शाखा – नांदगाव, जिल्हा नाशिक यांच्या तर्फे आज ८ मार्च २०२३ रोजी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक येथे लोकशाही व अहिंसेच्या मार्गाने वस्त्र त्याग धरणे आंदोलन केले जाणार आहे.

या आंदोलनात नांदगाव तालुका पतसंस्था फेडेरेशनने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
या उपरही नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठेवी परत करण्याची कुठलीही ठोस कार्यवाही न केल्यास फेडेरेशन तर्फे अधिक उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नांदगाव तालुका पतसंस्था फेडरेशन ने दिला आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...

read more
जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

नांदगाव - ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ (आबा)...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना...

read more
अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
.