loader image
[ays_poll id=7]

दोन लाखाची लाच स्वीकारताना वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना एसीबी ने केली अटक

Mar 8, 2023

धुळे विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत केलेल्या वीज जोडणीचे बिल विना त्रुटी मंजूर करण्याच्या मोबदल्यात 2 लाख रुपयांची लाच घेताना महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या धुळे येथील वित्त व लेखा विभागाच्या व्यवस्थापक व उप व्यवस्थापकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्यवस्थापक अमर अशोक खोबडे (वय 41, रा. जमनागिरी रोड, धुळे) व उप व्यवस्थापक मनोज अरुण पगार (वय 46, रा. विवेकानंद कॉलनी, चाळीसगाव) यांना लाच घेताना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे शासकीय नोंदणीकृत ठेकेदार आहेत. त्यांनी मराविवि कंपनी अंतर्गत जिल्हा नियोजन योजनेत धुळे मंडळ कार्यालय अंतर्गत वीज जोडणी संदर्भात 2018-19 या वर्षात ठेका घेऊन 56,31,590 रूपयांचे काम पूर्ण केले होते. त्या कामाच्या सादर केलेल्या बिलात त्रूटया न काढता सदर प्रलंबित बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात खोंडे व पगार यांनी तक्रारदाराकडे 5 लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती अडीच लाख रुपयाची लाचेची मागणी निश्चित करून यापैकी पहिला हप्त्याच्या स्वरूपात 2 लाख रुपये खोंडे व पगार यांनी त्यांच्या केबिनमध्ये स्वीकारले. ही कारवाई ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, शरद काटके, संतोष पावरा, भूषण खलाणेकर, भूषण शेटे,गायत्री पाटील, सुधीर मोरे, रामदास बारेला, मकरंद पाटील , प्रशांत बागुल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे यांच्या पथकाने केली.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.