loader image
[ays_poll id=7]

भूमी अभिलेख विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना तीन लाखांची लाच घेतांना एसीबी ने केली अटक

Mar 10, 2023


भूमिअभिलेख विभागाच्या अधीक्षकाला लाच घेताना पकडल्याच्या घटनेला महिनाही उलटत नाही तोच काल त्र्यंबकच्या भूमिअभिलेख विभागातील दोघा अधिकार्‍यासह एका खासगी एजंटला तब्बल तीन लाखांची लाच घेताना पथकाने रंगेहाथ पकडले. त्यामुळे भूमिअभिलेख विभागातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.
शर्मिष्ठा वालावलकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लाचखोरांविरोधात चांगलीच मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
तब्बल 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्या प्रकरणी त्र्यंबकेश्वर भूमी अभिलेख उप अधीक्षक कार्यालयातील 2 जणांसह एका खासगी इसमाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. भुमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार दौलत नथू समशेर (व43, रा. फ्लॅट नं 6, चैत्र चंद्र अपार्टमेंट, समर्थ नगर, वडाळा पाथर्डी रोड, इंदिरा नगर, गोकुळ हॉस्पिटल जवळ, नाशिक), भूकरमापक भास्कर प्रकाश राऊत, (वय 56, रा. रो हाऊस नं 3, 4, रामकुंज अपार्टमेंट, रामकृष्ण नगर, राम मंदिर जवळ, चुंचाळे शिवार, अंबड नाशिक) व वैजनाथ नाना पिंपळे, (वय 34, रा. रो हाऊस नंबर 1, ऋषिराज रो हाऊस, शांतीनगर, मखमलाबाद रोड, नाशिक) अशी लाच मागणार्‍या तिघांची नावे आहेत. तक्रारदाराचे फायनल लेआऊटमध्ये त्रुटी दाखवून शेजारील गटातील क्षेत्र तक्रारदार यांचे गटात सरकून न देण्याच्या मोबदल्यात समशेर व राऊत यांनी तक्रारदारकडे 29 डिसेंबर 2022 रोजी 10 लाख रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार तयार न झाल्याने 11 जानेवारी 2023 रोजी 6 लाख रुपये लाच मागितली शेवटी तडजोडी अंती 16 जानेवारी 2023 रोजी 3 लाख रुपयांची लाचेची मागणी करून पिंपळे याने ही लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाच मागितल्याची खात्री झाल्यावर वरील तिघांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर- घारगे, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गायत्री मधुकर जाधव, पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक अनिल बागुल, पो ना. प्रकाश महाजन, पो. ना. किरण अहिरराव, पो. ना. अजय गरुड, चा. पो. शि. परशुराम जाधव यांच्या पथकाने केली.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये ४५ किलो वजनी गटात ६०...

read more
सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

राज्यातील सराफ सुवर्णकार बांधव जे सराफी व्यवसाय करतात त्यांच्या सुरक्षेबाबतच्या समस्यांचे निराकरण...

read more
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

  आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव विधानसभा मतदार संघातील साकोरा ग्रामपंचायत...

read more
नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.

नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.

रणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामवाडी व बिरोळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सतीचा माता...

read more
.