loader image
[ays_poll id=7]

मनमाड दौंड मार्गावर २२ व २३ मार्च रोजी ब्लॉक – अनेक गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलले

Mar 11, 2023


मनमाड – दौंड रेल्वे विभागातील बेलापूर, चितळी, पुणतांबा या ठिकाणी दौंड-मनमाड-दौड दुहेरी रेल्वे मार्गाच्या लाईन यार्डच्या रिमॉडेलिंग कामामुळे दि. २२ व २३ मार्च रोजी मनमाड दौंड रेल्वे मार्गावर – रेल्वेचा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्या अन्य मार्गाने वळवल्या जातील अशी माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने प्रसिध्दी पत्रकात दिली. रद्द झालेल्या व मार्ग वळवण्यात आलेल्या बहुतांशी रेल्वे प्रवाशी गाड्या या मनमाड जंक्शन रेल्वे मार्गे धावणाऱ्या असल्याने ह्या दोन दिवसात प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

ब्लॉकः अनेक गाड्या झाल्या रद्द कर्नाटक एक्सप्रेस दि. २२ व २३ मार्च रोजी पुणे दौंड- मनमाड ऐवजी पुणे लोणावळा- वसईरोड या मार्गाने धावणार आहे. तर यशवंतपूर चंदिगड ही गाडी पुणे-लोणावळा-कल्याण मनमाड मार्गे वळवण्यात आली आहे. तसेच यशवंतपूर निजामुद्दीन ही गाडी २१ मार्च रोजी पुणे-कल्याण मनमाड मार्गे पुणे-गोरखपूर एक्सप्रेस २२ मार्च रोजी पुणे-कल्याण -मनमाड मार्गे वळवण्यात आली आहे तर दानापूर पुणे ही गाडी दि. २२ मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे. मनमाड कल्याण मार्गे पुणे बंगलोर -दिल्ली येथे वळवण्यात आली आहे.

रद्द केलेल्या गाड्या नांदेड-पुणे एक्सप्रेस २१ व २२ मार्च, पुणे-नांदेड २२ व २३ मार्च, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस २१ व २२ मार्च तर गोंदिया – कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस २२ व २३ मार्च, दादर साईनगर शिर्डी – एक्सप्रेस २१ व २२ मार्च तर साईनगर शिर्डी दादर २२ व २३ मार्च, नागपूर पुणे नागपूर एक्सप्रेस दि.२१, २२, २३ मार्च रोजी रद्द –

 

🟡 रद्द करण्यात आलेल्या गाड्या

1) 17630 नांदेड — पुणे एक्सप्रेस दि.21 आणि 22 मार्च रोजी रद्द राहिल.

2) 17629 पुणे — नांदेड एक्सप्रेस,दि.22 आणि 23 मार्च रोजी रद्द राहिल.

3) 11039 कोल्हापुर — गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस,दि.21 आणि 22 मार्च रोजी रद्द राहिल.

4) 11040 गोंदिया — कोल्हापुर महाराष्ट्र एक्सप्रेस,दि.22 आणि 23 मार्च रोजी रद्द राहिल.

5) 11041 दादर — साईनगर शिर्डी एक्सप्रेस,दि.21 आणि 22 मार्च रोजी रद्द राहिल.

6) 11042 साईनगर शिर्डी — दादर एक्सप्रेस,दि.22 आणि 23 मार्च रोजी रद्द राहिल.

7) 12114 नागपुर — पुणे गरीबरथ सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.21 मार्च रोजी रद्द राहिल.

8) 12113 पुणे — नागपुर गरीबरथ सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.22 मार्च रोजी रद्द राहिल.

9) 12136 नागपुर — पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.22 मार्च रोजी रद्द राहिल.

10) 12135 पुणे — नागपुर सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.23 मार्च रोजी रद्द राहिल.

🔴 गाड्यांचे मार्ग परिवर्तन

1) 12627 बंगलौर — नई दिल्ली कर्नाटका सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.22 आणि 23 मार्च रोजी लोणावळा,बोरिवली,वडोदरा,रतलाम,संत हिरदाराम नगर मार्गे धावेल.

2) 22685 यशवंतपुर — चंदीगढ कर्नाटका संपर्कक्रांती सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.22 मार्च रोजी लोणावळा,पनवेल,कल्याण,मनमाड मार्गे धावेल.

3) 12629 यशवंतपुर — हजरत निजामुद्दीन कर्नाटका संपर्कक्रांती सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.21 मार्च रोजी लोणावळा,पनवेल,कल्याण,मनमाड मार्गे धावेल.

4) 22845 पुणे — हटीया ट्राय-विकली सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.22 मार्च रोजी दौंड,वाडी,सिकंदराबाद,बल्हारशाह,नागपुर मार्गे धावेल.

5) 11037 पुणे — गोरखपुर विकली एक्सप्रेस,दि.22 मार्च रोजी लोणावळा,पनवेल,कल्याण,मनमाड मार्गे धावेल.

6) 12129 पुणे — हावडा आझादहिंद सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.22 मार्च रोजी दौंड,वाडी,सिकंदराबाद,बल्हारशाह,नागपुर मार्गे धावेल.

7) 12130 हावडा — पुणे आझादहिंद सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.20 आणि 21 मार्च रोजी नागपुर,बल्हारशाह,सिकंदराबाद,वाडी,दौंड मार्गे धावेल.

8) 22689 अहमदाबाद — यशवंतपुर विकली सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.21 मार्च रोजी सूरत,बोरिवली,लोणावळा,पुणे मार्गे धावेल.

9) 11078 जम्मुतवी — पुणे झेलम एक्सप्रेस,दि.21 आणि 22 मार्च रोजी संत हिरदाराम नगर,रतलाम,वडोदरा,बोरिवली,लोणावळा मार्गे धावेल.

10) 12780 हजरत निजामुद्दीन — वास्को-द-गामा गोवा सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.21 आणि 22 मार्च रोजी मनमाड,ईगतपुरी,पनवेल,लोणावळा मार्गे धावेल.

11) 12628 नई दिल्ली — बंगलौर कर्नाटका सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.21 आणि 22 मार्च रोजी संत हिरदाराम नगर,रतलाम,वडोदरा,बोरिवली,लोणावळा मार्गे धावेल.

12) 12150 दानापुर — पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.21 आणि 22 मार्च रोजी मनमाड,ईगतपुरी,पनवेल,लोणावळा मार्गे धावेल.

🟢 पुणे स्टेशन हुन 03:25 तास नियंत्रित करुन धावणार्या गाड्या

1) 02131 पुणे — जबलपुर विकली स्पेशल फेयर एक्सप्रेस,दि.13 आणि 20 मार्च रोजी नियंत्रित करुन धावेल.

2) 12103 पुणे — लखनऊ विकली सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.14 आणि 21 मार्च रोजी नियंत्रित करुन धावेल.

3) 22845 पुणे — हटीया ट्राय-विकली सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.12,,15 आणि 19 मार्च रोजी नियंत्रित करुन धावेल.

4) 11030 पुणे — गोरखपुर विकली एक्सप्रेस,दि.11 आणि 18 मार्च रोजी नियंत्रित करुन धावेल.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
.