मनमाड :- मनमाड- चांदवड रोडवरील दरेगाव नाका येथे एका महिलेच्या गळ्यातून १५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची पोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिस स्थानकात माया संतोष पगारे ( वय ३६) यांनी तक्रार दिली असून, पुढील तपास प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत. वारंवार होणाऱ्या चोऱ्या रोखण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कौशल शर्मा यांचा सत्कार.
मनमाड:- मनमाड क्रिकेट असोसिएशन चे कार्यकारी सदस्य कौशल शर्मा यांची मनमाड शहर रोटरी क्लब...





