९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे.
RRR या चित्रपटातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला ‘बेस्ट ओरिजनल साँग’चा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
भारतीय प्रोडक्शनमध्ये बनलेले हे पहिले गाणे आहे ज्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
‘आरआरआर’ या तेलुगू सिनेमातील ‘नाटू नाटू’ हे गाणे इतके लोकप्रिय झालंय की, इंटरनेटवर त्याचीच चर्चा आहे. आता तर हे गाणं ओरिजन साँगचा पुरस्कारासाठी ऑस्करच्या शर्यतीत आहे. बीबीसी कल्चरच्या चारुकेशी रामदुरै यांनी या गाण्याच्या लोकप्रियतेची कारणं सांगितली आहेत.
दाढीवाला एक हिंदुस्तानी तरूण इंग्रजाला उद्देशून विचारतो की, “सालसा नाही, फ्लेमेंकोही नाही, तुला नाटूबद्दल माहित आहे का?” त्या इंग्रजाच्या उत्तराची वाट न पाहताच, तो तरूण त्याच्या मित्रासोबत त्या गाण्यावर थिरकू लागतो. सिनेपडदा गाजवणाऱ्या या गाण्याने अनेकांना प्रत्यक्षातही थिरकायला लावलंय.
परदेशींच्या त्या कार्यक्रमात अल्लुरी सीतारामा राजू (राम चरण तेजा), कुमारम भीम (एनटी रामाराव ज्युनियर) आपल्या हसऱ्या चेहऱ्याने आणि पँटच्या पट्ट्याच्या सहाय्यानं थिरकण्यास सुरुवात करतात आणि कमालीचा वेग धरतात.
‘नाटू’ शब्दाचा अर्थ अस्सल देशी आहे. इथल्या मातीच्या सुगंधाची अभिव्यक्ती आहे. या गाण्यातील प्रत्येक शब्द त्या गोष्टीशी नातं सांगतो, ज्या गोष्टींना इथल्या मातीचा गंध आहे. खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचं गीत ‘नाटू नाटू’ गाणं या सिनेमाचा खऱ्या अर्थानं आशय आहे. आरआरआर सिनेमात स्वातंत्र्याचे दोन नाटू योद्धा ताकदवान ब्रिटिशांशी भिडतात.