loader image
[ays_poll id=7]

स्टेट बँक ऑफ इंडिया ने आणली नवीन मुदत ठेव योजना – जाणून घ्या ” एस बी आय सर्वोत्तम ” योजना

Mar 14, 2023


देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना एक जबरदस्त भेट दिली आहे.
बँकेने दोन वर्षांसाठी ‘एसबीआय सर्वोत्तम’ नावाची नवीन मुदत ठेव योजना सुरू केली आहे.एसबीआय सर्वोत्तम योजनेअंतर्गत, बँक आपल्या सर्वसाधारण ग्राहकांना ७.४० टक्के व्याज देणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीच्या एफडीसाठी ७.९० टक्के म्हणजेच, ०.५० टक्के व्याज अधिक मिळणार आहे.
स्टेट बँकेने याआधीच ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.कोण स्टेट बँक ऑफ इंडिया च्या सर्वोत्तम एफडी योजनेत, कोणताही भारतीय नागरिक आणि संस्था गुंतवणूक करू शकते.
अल्पवयीन आणि अनिवासी भारतीयांना बँकेच्या या विशेष एफडी योजनेत गुंतवणूक करता येणार नाही.
किमान १५.०१ लाखांसह या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे.
तर, या योजनेच्या अंतर्गत जास्तीत जास्त २ कोटी रुपयांपर्यंत एफडी करता येऊ शकते.
स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी वेगवेगळ्या एफडी योजना सुरू केल्या आहेत.
त्यात सामान्य ग्राहकांना ३ ते ७.१० टक्के व्याज दिले जाते.
तर, ज्येष्ठ नागरिक असलेल्या ग्राहकांना ३.५० टक्के ते ७.५० टक्क्यांपर्यंत व्याज मिळते.
स्टेट बँकेत ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीसाठी FD करता येते.
याशिवाय, बँकेत कर बचतीसाठी पात्र असलेल्या एफडी योजना देखील आहेत.
त्या अंतर्गत सर्वसामान्य ग्राहकाला ६.५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकाला ७.५० टक्के व्याज मिळते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.