loader image
[ays_poll id=7]

कोंबड्यांचे जेवण अभियंत्याला पडले महागात – गोंदिया मध्ये लाच लुचपत विभागाने केली अटक

Mar 15, 2023


गोंदियामध्ये लाचखोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून अनुदानाचे पैसे मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपये रोख आणि कोंबड्याचे जेवण मागणाऱ्या गोंदियामधील गोरेगाव पंचायत समितीच्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले आहे. जगदीश रहांगडाले असे या आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार याच्या वडिलांच्या नावाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 2021-22 मध्ये गुरांच्या गोठ्या बांधकामासाठी 77 हजार रुपये अनुदान मंजूर झाले होते. तक्रारदार यांनी गोठ्याचे बांधकाम पूर्ण केले असून हे बांधकाम आणि बांधकामाच्या बिलाची तपासणी करून बरोबर असल्याचा शेरा दिला. बिल मंजुरीसाठी आरोपी याने तक्राराकडून आधी पाच हजार रुपये घेतले होते. त्यानंतर आणखी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती दोन हजार रुपये आणि कोंबड्याचे जेवण देण्याचे ठरले. या मागणीनंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाला याबाबतची माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर खातरजमा करून गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. या घटनेने गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.