loader image
[ays_poll id=7]

मविप्र च्या मनमाड महाविद्यालयात मुलींसाठी कार्यशाळा

Mar 15, 2023


मनमाड – दि.14/03/2023 रोजी मराठा विद्या प्रसारक समजाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,मनमाड ता.नांदगाव जि.नासिक व विद्यार्थी विकास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय “निर्भय कन्या अभियान” शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. डी.डी. गव्हाणे, मा.श्रीमती सपना गवांदे (महिला पोलिस अंमलदार) तसेच मा.डॉ प्रियांका कोल्हे (स्री रोग तज्ञ) यांच्या शुभ हस्ते झाले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी.डी. गव्हाणे यांनी भूषविले. तसेच सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. ए.बी.जाधव यांनी केले. याप्रसंगी तज्ञ व्याख्यात्यांच्या व्याख्यानांचे व स्री स्व-संरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम सत्रात व्याख्याते म्हणून डॉ.प्रियका कोल्हे यांनी “स्रियांचे आरोग्य व उपाययोजना” या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे दुसर्‍या सत्रात व्याख्यात्या मा.श्रीमती सपना गवांदे यांनी “स्त्री हक्क व संरक्षक विषयक कायदे” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले व विद्यार्थिंनिंशी संवाद साधला. दुसर्‍या सत्रा नंतर विद्यार्थिंनिंसाठी चहा व अल्पोपहार ठेवण्यातआला . सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ फापाळे ए.एस. यांनी केले. सदर कार्यक्रमास मा.सी.ए. डॉ.कदम पी. आर, प्रा. डॉ.जे. डब्लु मोहोड, प्रा.भाबड एन.व्ही, प्रा.बहोत आर.जे, प्रा.गवळी, प्रा.श्रीमती कर्डेल ए एस.,प्रा.श्रीमती काकळीज के.एस, प्रा.ए.पी.नवले, प्रा. बोरसे.एस.डी. व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. सदर या कार्यशाळेत 65 विद्यार्थिनींनी व महिला प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग घेतला.


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.