loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांचा भाजपात प्रवेश

Mar 15, 2023


राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा गोदावरी बँकेच्या अध्यक्षा अमृता पवार यांनी काल मुंबईत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांनीही भाजप प्रवेश करत सर्वांना धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, सुरेशबाबा पाटील, आमदार अॅड्. राहुल ढिकले, पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी उपस्थित होते. माजी खासदार डॉ. वसंतराव पवार आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमामाताई पवार यांच्या कन्या वास्तूविशारद अमृता यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागामध्ये भाजपला बळ मिळणार आहे. अमृता यांनी देवगाव (ता. निफाड) गटातून जि.प. निवडणूक जिंकली होती.


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.