Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांचा भाजपात प्रवेश

Mar 15, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा गोदावरी बँकेच्या अध्यक्षा अमृता पवार यांनी काल मुंबईत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांनीही भाजप प्रवेश करत सर्वांना धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, सुरेशबाबा पाटील, आमदार अॅड्. राहुल ढिकले, पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी उपस्थित होते. माजी खासदार डॉ. वसंतराव पवार आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमामाताई पवार यांच्या कन्या वास्तूविशारद अमृता यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागामध्ये भाजपला बळ मिळणार आहे. अमृता यांनी देवगाव (ता. निफाड) गटातून जि.प. निवडणूक जिंकली होती.

अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नाने २९ कुटुंबीयांना आर्थिक सहायता निधी प्रदान!

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नाने २९ कुटुंबीयांना आर्थिक सहायता निधी प्रदान!

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नाने नांदगाव तालुक्यातील 29 कुटुंबीयांना शासकीय आर्थिक मदत...

read more
विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी आमिन शेख यांची निवड…

विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी आमिन शेख यांची निवड…

१६वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे संपन्न झाले. या साहित्य संमेलन मध्ये विद्रोही...

read more
जातीयवादी व बदनामीकारक खोटे आरोप करणाऱ्या खा.राणांवर कठोर कारवाईची युवतीसेनेची मागणी :निवेदन सादर

जातीयवादी व बदनामीकारक खोटे आरोप करणाऱ्या खा.राणांवर कठोर कारवाईची युवतीसेनेची मागणी :निवेदन सादर

खा . नवनीत राणा यांनी मुंबई पोलीस व महाराष्ट्र शासनावर जातीयवादी व बदनामीकारण खोटे आरोप केल्याने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]