Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांचा भाजपात प्रवेश

Mar 15, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा गोदावरी बँकेच्या अध्यक्षा अमृता पवार यांनी काल मुंबईत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांनीही भाजप प्रवेश करत सर्वांना धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, सुरेशबाबा पाटील, आमदार अॅड्. राहुल ढिकले, पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी उपस्थित होते. माजी खासदार डॉ. वसंतराव पवार आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमामाताई पवार यांच्या कन्या वास्तूविशारद अमृता यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागामध्ये भाजपला बळ मिळणार आहे. अमृता यांनी देवगाव (ता. निफाड) गटातून जि.प. निवडणूक जिंकली होती.

अजून बातम्या वाचा..

पुतळा जीर्णोध्दार व शिवस्फूर्ती स्मारक नूतनीकरण सोहळा जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न

पुतळा जीर्णोध्दार व शिवस्फूर्ती स्मारक नूतनीकरण सोहळा जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न

नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून शहरातील शिवस्फूर्ती मैदानावरील...

read more
डॉ. सुधीर शेतकर अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून रुजू

डॉ. सुधीर शेतकर अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून रुजू

डॉ. सुधीर शेतकर यांनी नवी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, ( AIIMS ) या...

read more
शिवस्फुर्ती जिर्णोद्धार सोहळ्यात बहुसंख्येने सहभागी रहावे मराठा महासंघाचे जाहीर आवाहन.!

शिवस्फुर्ती जिर्णोद्धार सोहळ्यात बहुसंख्येने सहभागी रहावे मराठा महासंघाचे जाहीर आवाहन.!

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]