Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांचा भाजपात प्रवेश

Mar 15, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा गोदावरी बँकेच्या अध्यक्षा अमृता पवार यांनी काल मुंबईत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांनीही भाजप प्रवेश करत सर्वांना धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, सुरेशबाबा पाटील, आमदार अॅड्. राहुल ढिकले, पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी उपस्थित होते. माजी खासदार डॉ. वसंतराव पवार आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमामाताई पवार यांच्या कन्या वास्तूविशारद अमृता यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागामध्ये भाजपला बळ मिळणार आहे. अमृता यांनी देवगाव (ता. निफाड) गटातून जि.प. निवडणूक जिंकली होती.

अजून बातम्या वाचा..

मालेगावमध्ये राष्ट्रवादीचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला दणका – काँग्रेसच्या महापौरांसह २७ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार !

काँग्रेस चे माजी आमदार रशीद शेख यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेवून आज महापौरांसह काँग्रेस चे २७...

read more

आमदार सुहास कांदे यांची वीज वितरण कंपनीच्या अधिकारी तथा कर्मचारी यांच्या सोबत एकत्रित बैठक संपन्न

सातत्याने ग्रामीण भागातील वीज वितरण कंपनीच्या कारभाराच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत आमदार सुहास...

read more

शिवसेना संस्थापक हिंदू ह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त चांदवड रोड टपरीधारक सेना शाखेचे नुतनीकरण व भव्य पक्ष प्रवेश सोहळा

आज दि. 23 जानेवारी हिंदू ह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त चांदवड रोड टपरीधारक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]