loader image
[ays_poll id=7]

एस टी महामंडळाच्या महिला सन्मान योजनेला आज पासून सुरुवात – महिलांना 50% सवलत

Mar 17, 2023

आता राज्यातील महिलांना एसटीमधून प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तिकिट दरात 50 टक्के सवलत मिळणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले.
अखेर या आदेशाचा जीआर निघाला असून आज शुक्रवारपासून एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांसाठी याआधीच सवलत जाहीर करण्यात आली आहे. जवळपास 30 प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात. या सवलतीची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला करण्यात येते. राज्य परिवहन महामंडळांकडून 30 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहेत.

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 ते 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती.

तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. या प्रवाशांच्या तिकीट दरातील शुल्क प्रतिपूर्ती महाराष्ट्र सरकार करणार आहे. एसटी प्रवासातील सवलतीबाबत शासनाने घोषणा 9 मार्चला केली तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची आवश्यकता असते. शासन आदेशाशिवाय कोणत्याही घोषणेवर अंमलबजावणी होत नाही.

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट 50 टक्के तिकीट दरामधे सवलत जाहीर केली. परंतु, या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जीआर निघाला नव्हता,तो आज निघाला असून आजपासून राज्यातील महिलांना एस टी प्रवासात 50 टक्के सूट मिळणार आहे.

अजून बातम्या वाचा..

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड च्या गिरी प्रेमींनी दुर्ग पूजन व ध्वजारोहण करत साजरा केला मूर्ती प्रतिष्ठापना क्षण

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड च्या गिरी प्रेमींनी दुर्ग पूजन व ध्वजारोहण करत साजरा केला मूर्ती प्रतिष्ठापना क्षण

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अगस्ती ऋषींचा वास्तव्य असलेल्या किल्ले अंकाई...

read more
अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मुक्तीच्या ऐतिहासिक आंदोलनामध्ये ओम मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड चे महत्वपूर्ण गौरवास्पद योगदान          देव,धर्म आणि राष्ट्र कार्याची स्वप्न पूर्ती ➖नितीन पांडे

मनमाड - सोमवार 22 जानेवारी 2024 (पौष शुद्ध द्वादशी )विश्वा तील सर्व हिंदू बांधवान साठी ऐतिहासिक...

read more
आमदार सुहास आण्णा कांदे यांना महानुभाव पंथाच्या वतीने”कर्तव्य परायण समाजविभूषण पुरस्कार” जाहीर

आमदार सुहास आण्णा कांदे यांना महानुभाव पंथाच्या वतीने”कर्तव्य परायण समाजविभूषण पुरस्कार” जाहीर

वितरण सोहळा होणार २३ जानेवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा हिसवळ खुर्द येथील दत्त मंदिर आश्रमात सुरू...

read more
जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे विदयार्थीनींचा संघ नमो चषक तालुकास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत उपविजेता.

जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे विदयार्थीनींचा संघ नमो चषक तालुकास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत उपविजेता.

उमराणे:- जि.प. विद्यानिकेतन, देवळा येथे झालेल्या नमो चषक 2024 क्रीडा चषक अंतर्गत देवळा...

read more
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डाॅ. भारतीताई पवार यांच्या हस्ते नांदगाव येथे २० खाटांचे फिल्ड हाॅस्पीटलचे उद्घाटन संपन्न

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डाॅ. भारतीताई पवार यांच्या हस्ते नांदगाव येथे २० खाटांचे फिल्ड हाॅस्पीटलचे उद्घाटन संपन्न

नांदगाव येथे केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ.भारतीताई पवार यांच्या हस्ते नांदगाव ग्रामीण रुग्णालय...

read more
.