loader image
[ays_poll id=7]

श्रीराम जन्मोत्सव समिती 2023 बैठक संपन्न

Mar 17, 2023


श्री रामरथ यात्रा मिरवणुकी चे आयोजन भव्य स्वरूपात होणार सालाबादप्रमाणे यंदा ही अखंडीत पणे सलग 37 व्या वर्षी श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी श्रीरामनवमी उत्सव तथा भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणूक कार्यक्रमाचे नियोजन करणे साठी मनमाड शहरात धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या आणि धार्मिक उत्सव कार्यात मानाचे स्थान असणाऱ्या ॐ मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती 2023 बैठक गत वर्षी चे अध्यक्ष सनी फसाटे यांचे अध्यक्षते खाली संम्पन्न झाली. सर्व प्रथम गत वर्षा मध्ये ज्ञात अज्ञात दिवंगत व्यक्ती ना समिती तर्फे सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. समिती चे संस्थापक सदस्य कोषाध्यक्ष आणि नितीन पांडे यांनी बैठकी चे प्रास्ताविक करीत गत वर्षी च्या श्रीराम नवमी उत्सवाचा जमा खर्च सादर केला. यंदा सर्व श्रीराम भक्तांनी एकमतानी 36 वर्ष जुन्या अध्यक्ष व कार्यकारिणी निवडी च्या परंपरे ला फाटा देत सदस्यांची श्रीराम उत्सव संयोजन समिती निर्माण केलीआहे. ती पुढील प्रमाणे श्रीराम जन्मोत्सव समिती 2023 जयकुमार फुलवाणी, संदेश पाटील, अभिषेक कांगणे, राहुल सांगळे अभिजित रसाळ,स्वराज शिंदे,समीर गुंजाळ, राजाभाऊ करकाळे,निशांत पाटील, दिपक कवडे, कृष्णा नेरकर,दीपेश इमले, प्रताप आव्हाड, प्रथमेश अहिरे,दादू सूडके. मार्गदर्शक समिती – नितीन पांडे नाना शिंदे, किशोर गुजराथी,गोविंद रसाळ,शेखर पांगुळ संतोष बळीद, आझाद आव्हाड,राजाभाऊ भाबड सुभाष माळवकर, पप्पू परब,नीलकंठ त्रिभुवन सनी फसाटे, नारायण पवार, प्रज्ञेश खांदाट. या अध्यक्ष विरहित समितीचे सर्वांनी जोरदार स्वागत केले. नाना शिंदे, संतोष बळीद,आझाद आव्हाड राजाभाऊ भाबड, किशोर गुजराथी यांनी बैठकिला अनमोल मार्गदर्शन केले तर भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी शहर भाजपा तर्फे श्रीराम रथ दुरुस्ती व रंगकाम खर्च करणार असल्याचे जाहीर केले. राहुल सांगळे, राजू करकाळे, कृष्णा नेरकर, अभिजीत रसाळ पप्पू परब, पंकज शर्मा यांनी ही डीजे, भगव्या झेंडे,टोप्या,व इतर आदी खर्चाची जबाबदारी स्वीकारली.यंदा मोठया उत्साहात भव्य श्रीराम रथ यात्रा मिरवणूक काढण्यासाठी नियोजन करण्यात आले या बैठकीला अनंता भामरे, नितीन अहिरराव, योगेश इमले, आशु पोहाल, नितीन परदेशी, दिपक पगारे, ऋतिक उल्हाळे,प्रशांत जंगम,सुमेर मिसर,शुभम बैरागी,कृष्णा वाढणे, संदेश गवळी,ऋषिकेश देशपांडे,श्रीकांत बहोत,विक्रम पाटील, अभिजीत पवार, ऋषिकेश सोनवणे, अक्षय देवरे संतोष शिंदे, आकाश पवार,आदी सह हिंदुत्ववादी पक्ष, संघटना संस्था मंडळे यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व श्रीराम भक्त मोठया संख्येने उपस्थित होते बैठकी चे सूत्रसंचालन नितीन पांडे यांनी केले पसायदान ने बैठक सांगता झाली.


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.