loader image

गोठ्यासाठीचे शासकीय अनुदान मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात लाच घेणाऱ्या चांदवड पंचायत समितीतील कंत्राटी अधिकारी एसीबी च्या जाळ्यात

Mar 17, 2023


चांदवड पंचायत समितीतील कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (APO) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला असून त्याचे नाव नारायण विश्वनाथ शिंदे (वय ४२ वर्षे) असे आहे. ४ हजार रुपयांची लाच घेताना तो एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने त्याच्या वडिलांच्या नावाने एक प्रस्ताव पंचायत समितीत दाखल केला होता. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचे गोठ्यासाठी शासकीय अनुदानाचे हे प्रकरण होते. हा प्रस्ताव मंजूर करून देण्याच्या कामाच्या मोबदल्यात शिंदे याने ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. अखेर तडजोडी अंती ४ हजार रुपये लाचेची रक्कम आज पंचायत समितीच्या कार्यालयात स्वीकारली. त्याचवेळी शिंदेला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा अधिकारी
श्रीमती वैशाली पाटील, पोलीस उप अधीक्षक ,ला.प्र.वि.,नाशिक.
सह सापळा अधिकारी – पो. नि. श्री.अनिल बागुल
सापळा पथक –
पो.ना.श्री.राजेश गीते,
पो.ना.श्री शरद हेंबाडे,
पो.ना.श्री.अजय गरुड
मार्गदर्शक
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर , पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मा.श्री. नारायण न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक,ला. प्र. वि. नाशिक
श्री. नरेंद्र पवार , पोलीस उपअधीक्षक, वाचक, ला.प्र.वि. नाशिक.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक
टोल फ्रि क्रं. 1064


अजून बातम्या वाचा..

.