loader image
[ays_poll id=7]

येवला तालुक्यातील वीर जवान अजित शेळके राजस्थान येथे कर्तव्य बजावत असताना शहीद

Mar 19, 2023


येवला तालुक्यातील जवानाला वीरमरण प्राप्त झाले आहे. तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील जवान राजस्थानमधील गंगानगर येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. अजित गोरख शेळके असे या जवानाचे नाव आहे. देशाचे संरक्षण करत असलेल्या जवानाचे निधन झाल्यानं येवला तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

राजस्थान राज्यातील गंगानगर येथे सेवेत असलेले महाराष्ट्राचे सुपुत्र अजित शेळके शहीद झाले आहेत. येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील ते रहिवासी होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच गावावर शोककळा पसरली आहे. अजित शेळके यांचे वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी वीरमरण आले आहे. अजित हे ड्युटीवरून घरी जात असताना युनिटमध्ये अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.

दरम्यान, अजित शेळके यांच्या निधनाने नाशिक जिल्ह्यासह येवला तालुक्यावर शोककळा पसरली आहे. येवला तालुक्यातील मानूर बुद्रुक येथील ते रहिवासी होते. परिसरात अजित हे अत्यंत ओळखीचे होते. त्यांचा मनमिळावू स्वभाव असल्याने असंख्य मित्रपरिवार आहे. दरम्यान अजित यांचे पार्थिव सोमवारपर्यंत त्यांच्या गावी येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रप्रेमासाठी‌ स्वत: चे जीवन समर्पित करु‌न आमच्या शेळके परिवारातील युवकाने वीरमरण पत्करुन भारत मातेच्या चरणी आपले आयुष्य समर्पित केले. अजित यांना लहानपणापासून देशसेवेची आवड होती. शिक्षण सुरू असताना त्याचा कल सैन्यदलाकडे होता. काही वर्षांपूर्वीच त्यांची सैन्यदलात निवड होऊन ते देशसेवा करत होते. मात्र वयाच्या 29 व्या वर्षी शहीद झाल्याने येवला तालुक्यावर शोककळा पसरली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला, बागलाण, निफाड आदी तालुक्यात हजारो जवान देशसेवेसाठी कार्यरत असून गेल्या काही महिन्यात जिल्ह्यातील अनेक जवान देशसेवेवर कार्यरत असताना शहीद झाले आहेत.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.