loader image
[ays_poll id=7]

कॉपी करू न दिल्यामुळे मनमाड ला विद्यार्थ्यांनी केली शिक्षकावर दगडफेक

Mar 21, 2023

बोर्ड परीक्षेत नियमानुसार कामकाज केल्याचा राग आल्याने पेपर सुटल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी शिक्षकावर दगडफेक करत जखमी केले. याप्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नीलेश दिनकर जाधव असे या जखमी शिक्षकाचे नाव आहे. नीलेश दिनकर जाधव (वय ३५) छत्रे विद्यालयातील कलाशिक्षक असून, स्वभावाने अत्यंत प्रेमळ असेल तरी शिस्त आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. सध्या दहावी बोर्डाचे पेपर सुरू असल्याने नीलेश जाधव यांना येथील एच. ए. के हायस्कूलमध्ये बोर्डाच्या परीक्षेत सुपरव्हिजनचे काम सोपविण्यात आले होते. पेपर सुरू असताना त्यांनी बोर्डाने घालून दिलेल्या नियमानुसारर काम सुरू ठेवले. नियमांचे उल्लंघन होईल असे काम त्यांनी वर्गात होऊ दिले नाही. याच गोष्टीचा राग आल्याने पेपर संपल्यानंतर ते आपले सर्व काम आटोपून शाळेच्या बाहेर पडले असता विद्यार्थ्यांच्या गर्दीतून त्यांच्या दिशेने काही विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. यात नीलेश जखमी झाले. त्यांच्या डोक्याला दगड लागल्याने ते रक्तबंबाळ झाले. अशाच अवस्थेत त्यांनी मनमाड पोलिस ठाणे गाठत सर्व घडलेली घटना सांगितली. त्यानंतर त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले. सदर हल्ला कोणत्या कारणामुळे झाला ते मात्र अद्यापही कळू शकले नाही. सध्या दहावीच्या बोर्डाचे पेपर सुरू असल्याने शाळेच्या गेटजवळ एका शिक्षकावर असा हल्ला होणे म्हणजे हे संशय निर्माण करणारी घटना आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
.