loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत सेमिनार ऑन क्रॅश कोर्स चे आयोजन

Mar 23, 2023


कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूलमध्ये नुकताच शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये इयत्ता १० वी ला प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ‘सेमिनार ऑन क्रॅश कोर्स’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर हे होते. आगामी वर्षी इयत्ता १० वी ला प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यांसाठी दि.२३ मार्च २०२३ पासून शाळेकडून मोफत क्रॅश कोर्स आयोजित केला असून या क्रॅश कोर्सची माहिती पालकांना या सेमिनारमध्ये देण्यात आली.
इयत्ता ९ वी ची वार्षिक परीक्षा संपल्यानंतर अवघ्या ५ दिवसाच्या सुट्टीनंतर लगेचच क्रॅश कोर्स सुरू होणार आहे. दि.२३ मार्च २०२३ पासून २९ एप्रिल २०२३ पर्यंत या कालावधीत होणा-या क्रॅश कोर्समध्ये अभ्यासक्रमातील २५% अभ्यासक्रमाबरोबरच मूलभूत पाया पक्का करण्याचे नियोजन केलेले आहे. शिकविलेल्या प्रत्येक भागाचे मुल्यमापन परीक्षा घेवून केले जाईल.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी आयोजित या क्रॅश कोर्समध्ये विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन, अभ्यासाचे वार्षिक नियोजन व केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. या सेमिनारमध्ये इयत्ता १० वी या वर्षाचे महत्व पालकांची जबाबदारी विद्यार्थ्यांचे कर्तव्य व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेने केलेले पूर्व व पूर्ण नियोजन याची तपशिलवार माहिती तसेच मंडळाच्या १० वी परीक्षेसंदर्भात असणा-या नियम व नियमावली यांची थोडक्यात माहिती उपस्थित पालकांना प्राचार्य श्री. मुकेश मिसर यांच्याकडून देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी नियोजनाप्रमाणे क्रॅशकोर्सला नियमित उपस्थित रहावे असे आवाहनही प्राचार्यांनी केलेले आहे.
पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास अनुकूल अशा विविध सुचना मांडल्या. तसेच शाळेकडून इयत्ता १० वी साठी प्रत्येक वर्षी मोफत क्रॅश कोर्सची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या परंपरेचे स्वागत व कौतुक केले.
सेमिनार यशस्वी करण्यासाठी श्री. दिपक व्यवहारे, श्री. वैभव कुलकर्णी, श्री. धनंजय निंभोरकर, श्री. तुषार चौधरी व इयत्ता १० वीच्या वर्गशिक्षिका सौ. प्रतिभा पवार, वर्गशिक्षक श्री. सचिन बिडवे आदींचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.