loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी सेविका रंजना निकम यांच्या पाक कृतीचे होत आहे कौतुक

Mar 25, 2023

राष्ट्रीय पोषण पंधरवडा २०२३ चे कालावधीत लाभार्थींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा दररोज नव्या पाककृती तयार करतात अंगणवाडी सेविका रंजना ताई निकम.पालकांकडून या अभिनव उपक्रमाचे होते आहे कौतुक मयुरी महिरे मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२.
दिनांक २० मार्च ते ०३ एप्रिल २०२३सर्वत्र पोषण पंधरवडा साजरा केला जातो आहे..याकालावधीत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ अधिनस्त अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रात विविध उपक्रमांचे दैनंदिन वेळापत्रकानुसार आयोजन केले जाते आहे..पोषणाचे वर्तनात बदल घडवून आणणेसाठी लोकसहभाग मिळविला जात आहे..यात विविध थीमवर आधारीत उपक्रम राबवुन सोशल मिडियाचा जास्तीत-जास्त वापर करुन जनजागृती केली जात आहे..या पोषण पंधरवड्याचे औचित्यसाधून लाभार्थींना पोषणासाठी उपयुक्त ठरणारी अशी दररोज एक पाककृती बनवून त्या व्हाट्स अँपग्रुपद्वारे पालकांपर्यंत पोहोचवत आहेत..सदर पाककृती सोशल मिडियावर टाकल्या जात आहेत..जेणेकरुन इतर नागरिकांनाही याचा फायदा व्हावा.रंजना ताई निकम भगुर या फक्त पाककृतीच तयार करत नसुन त्या पाककृतीची सविस्तर माहिती, त्यासाठी लागणारे साहित्य, पाककृतींचा लाभार्थींना होणारा फायदा याबाबीही त्या सर्वांपर्यंत सोशल मिडियाद्वारे मेसेज करुन पोहोचवत आहेत..यासर्व पाककृती स्थानिक पदार्थ, पालेभाज्या, फळभाज्या वापरुन बनविल्या जाताता..ह्या पाककृतींद्वारे लाभार्थी/पालकांना स्थानिक पदार्थांचा आहारात वापर व उपयोग याबाबीही पटवून दिल्या जात आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे पालकवर्गाकडून कौतुक केले जात असल्याची माहिती मुख्यसेविका मयुरी महिरे यांनी दिली..

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
.