Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात

Mar 29, 2023

शिर्डी येथील साईबाबा मंदिरात साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून शिर्डीत आजपासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. 1911 साली सुरू झालेला रामनवमी उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. पुढील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्या म्हणजेच रामनवमीच्या मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. राज्यभरातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी मांडव उभारण्यात आले. साईमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात येणार आहे. मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व प्रवेशव्‍दारावर काल्‍पनिक भव्‍य देखावा उभारण्‍यात आलाय.

अजून बातम्या वाचा..

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये वैकुंठ चतुर्दशी निमित्ताने “श्री हरी-हर” भेट संपन्न….!

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये वैकुंठ चतुर्दशी निमित्ताने “श्री हरी-हर” भेट संपन्न….!

कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावेही ओळखली जाते. असे म्हणतात, की या तिथीला...

read more

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना मनमाड शहर शाखेच्या वतीने स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]