Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात

Mar 29, 2023

शिर्डी येथील साईबाबा मंदिरात साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून शिर्डीत आजपासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. 1911 साली सुरू झालेला रामनवमी उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. पुढील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्या म्हणजेच रामनवमीच्या मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. राज्यभरातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी मांडव उभारण्यात आले. साईमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात येणार आहे. मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व प्रवेशव्‍दारावर काल्‍पनिक भव्‍य देखावा उभारण्‍यात आलाय.

अजून बातम्या वाचा..

मनमाड वर्कशॉप मधील एल.एस.सेक्सन तर्फे दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त खिरदान..

मनमाड वर्कशॉप मधील एल.एस. सेक्सन तर्फे दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ने खिरदान करण्यात आली....

read more

निमगाव मढ येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या ७४ वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर ; ७४ रक्त पिशव्यांचे संकलन

10 ऑक्टोबर रविवार रोजी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन...

read more

धम्म,श्रामनेर शिबरातून मानवी मन मेंदू चिक्तीत्सक व उदबोधित होतो – नामदेव पगारे पूज्य भन्ते दीपंकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्तीभूमी येथे दहा दिवसीय श्रामनेर शिबिरास प्रारंभ

येवला : तथागत बुद्धाने जगाला जीवनाचा सम्यक मार्ग दिला असून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]