loader image
[ays_poll id=7]

फ्लाईंग स्क्वाड ने विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांकडून केला १५ लाख रुपये दंड

Apr 1, 2023


मनमाड :रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा बलाकडून धावत्या रेल्वे गाडीत आणि रेल्वे स्थानकातील विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एका दिवसात ( फ्लाईंग स्कॉड द्वारे ) भुसावळ विभागाने २४७८ विनातकीट प्रवाशांकडून १५ लाख ४४ हजार रुपये दंड वसुल केले. यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच चाप बसला आहे.
रेल्वेचा महसूल बुडवणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासन तिकीट तपासणी मोहीम राबवत असते.मध्य रेल्वे भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानकावर आणि प्रवाशी रेल्वे गाड्यामधील फुकट्या प्रवाश्याविरुद्ध एक दिवसीय तपासणी मोहीम राबवण्यात आली. मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पुणे आदी विविध भागांत येणाऱ्या गाड्यांमधून तसेच रेल्वे स्थानकावर थांबल्या असता उतरणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे स्थानकावर अचानक धाड पडल्यावर विनातिकीट प्रवाशांचे धाबे दणाणून गेले होते.रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच भुर्दंड बसला आहे.

भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड, भुसावळ, खंडवा, आणि बडनेरा रेल्वे स्थानक आणि इगतपुरी – भुसावळ, भुसावळ ते अमरावती, खंडवा – भुसावळ स्थानका दरम्यान प्रवासी रेल्वे गाडीत एक दिवसीय तिकीट चेकिंग मोहीम राबविण्यात आली.वाणिज्य विभागातील कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक, रेल्वे कर्मचारी आणि २ वरिष्ठ अधिकाऱ्यानी सहभाग घेत ४७ पथक तयार करून मध्य रेल्वे विभागात धावणाऱ्या जवळपास ९४ हुन अधिक प्रवासी रेल्वे गाड्या एक दिवसीय तपासणी( फ्लाईंग स्कॉड द्वारे )करण्यात आले.

भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे प्रबंधक एस. एस.केडिया यांच्या अध्यक्षते खाली व भुसावळ विभागाचे मुख्य विभागीय वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गर्शनानुसार भुसावळ वाणिज्य विभाग व रेल्वे सुरक्षा बल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हि मोहिम राबिण्यात आले.

प्रवास करताना योग्य ते तिकीट घ्या व ज्या क्लासचे तिकीट आहे त्या क्लास मध्ये प्रवास करावा. जर तिकिट लाईन मध्ये उभे न राहता तिकीट हवे असेल तर आपण युटीएस ॲपचा वापर प्रवाशांनी करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

केटचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांना दिल्लीतुन उमेदवारीचे स्वागत – कल्पेश बेदमुथा सचिव,केट महाराष्ट्र

केटचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांना दिल्लीतुन उमेदवारीचे स्वागत – कल्पेश बेदमुथा सचिव,केट महाराष्ट्र

संपूर्ण देशाच्या व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असणारे अखिल भारतीय व्यापारी महासंघ यांचे...

read more
दुष्काळ सदृश मंडळाना मदती पासून ठेंगा –  महेंद्र बोरसे  तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट

दुष्काळ सदृश मंडळाना मदती पासून ठेंगा –  महेंद्र बोरसे  तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट

नांदगाव -(सोमनाथ घोंगाने) अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने  दुष्काळ सदृष्य मंडळांना...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार

मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार

मनमाड - ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुबंई,नाशिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, विभागीय...

read more
बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

नांदगाव आणि मनमाड शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे...

read more
.