Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कांदा पिकाची ई. पिक नोंदीची जाचक अट त्वरीत रद्द करावी – कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

Apr 3, 2023

नांदगाव – (सोमनाथ घोंगाणे)
महाराष्ट्र शासनाने कांदा पिकासाठी ३५० रूपये क्विंटल अनुदान जाहीर केले पण सातबारा उताऱ्यावर ई पिक पेरा नोंद बंधनकारक केल्याने सुमारे ९० % शेतकर्यांची ई पिक नोंद नसल्याने शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. सदर अट त्वरीत रद्द करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, कांदा उत्पादक संघटना यांचेकडून आज तहसिलदार नांदगाव यांना निवेदन देण्यात आले.
राज्य कांदा उत्पादक संघटनेचे सोमनाथ मगर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निलेश चव्हाण,परशराम शिदें,विशाल वडघुले,योगेश वाघ,भाऊसाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी पिक पेरा ई नोंद ही अट त्वरीत करावी व सरसकट सर्व कांद्याला अनुदान देण्यात यावे. तसे यंत्रणेला त्वरीत आदेश देवून पीक नोंदणीचे कामकाज करावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

श्री राहुल सोलापुरकर यांच्या व्याख्यानाने ‘विवेकानंद व्याख्यानमाला 2022’ चा समारोप

संस्कृती संवर्धन समिती आयोजित स्वामी विवेकानंद व्याखानमालेचे आजचे तिसरे पुष्प प्रसिद्ध वक्ते...

read more

दहा प्रमुख उत्सवांसाठी जिल्ह्यात रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पिकर वाजविण्यास मुभा!

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशान्वये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत सुट...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]