Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कांदा पिकाची ई. पिक नोंदीची जाचक अट त्वरीत रद्द करावी – कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

Apr 3, 2023

नांदगाव – (सोमनाथ घोंगाणे)
महाराष्ट्र शासनाने कांदा पिकासाठी ३५० रूपये क्विंटल अनुदान जाहीर केले पण सातबारा उताऱ्यावर ई पिक पेरा नोंद बंधनकारक केल्याने सुमारे ९० % शेतकर्यांची ई पिक नोंद नसल्याने शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. सदर अट त्वरीत रद्द करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, कांदा उत्पादक संघटना यांचेकडून आज तहसिलदार नांदगाव यांना निवेदन देण्यात आले.
राज्य कांदा उत्पादक संघटनेचे सोमनाथ मगर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निलेश चव्हाण,परशराम शिदें,विशाल वडघुले,योगेश वाघ,भाऊसाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी पिक पेरा ई नोंद ही अट त्वरीत करावी व सरसकट सर्व कांद्याला अनुदान देण्यात यावे. तसे यंत्रणेला त्वरीत आदेश देवून पीक नोंदणीचे कामकाज करावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी ” जागृती अभियान ” राबवावे – राजाभाऊ पारिक

मनमाड - मनमाड शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी शहरात स्वच्छते संदर्भात जागृती अभियान राबविणे गरजेचे...

read more
महिलांचा सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणार-प्रा.लालसरे

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्थानिक विकास निधीतून पिंपराळे गावातील मंदिरासमोर सभागृहासाठी सुमारे 10 लाख रुपये मंजूर

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्थानिक विकास निधीतून पिंपराळे गावातील मंदिरासमोर सभागृहासाठी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]