loader image

आनंद सेवा केंद्र आयोजीत रक्तदान शिबिरात २०३ रक्तदात्यांचे योगदान

Apr 4, 2023


मनमाड शहरात सलग पंधरा वर्षांपासून भगवान महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त आनंद सेवा केंद्र तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. आजही महावीर भवन, मारुती रोड भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या रक्तदान शिबिरात विक्रमी २०३ रक्तदात्यांनी आपले योगदान देत या वर्षीही शिबिर यशस्वी करून दाखविले आहे.आनंद सेवा केंद्रातर्फे मनमाड शहरासह आता नांदगाव शहर परिसरातील नागरिकांसाठी रूग्णोपयोगी सेवा देणाऱ्या आनंद सेवा केंद्रातर्फे आयोजीत केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरात मनमाड कर नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. दर वर्षाप्रमाणे यंदाही विक्रमी रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले असून ह्या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आनंद सेवा केंद्राच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी आभार मानले असून भविष्यातही आनंद सेवा केंद्राच्या उपक्रमांना असाच भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आशा आनंद सेवा केंद्राचे अध्यक्ष कल्पेश बेदमुथा यांनी व्यक्त केली आहे.

 


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.