loader image
[ays_poll id=7]

श्री संत रविदास मागासवर्गीय को – ऑप हौसिंग सोसायटी निवडणुकीत शिवगर्जना पॅनल विजयी

Apr 5, 2023


मनमाड – श्री संत रविदास मागासवर्गीय को-ऑप हौसिंग सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवगर्जना पॅनलने दणदणीत विजय संपादन केला.
श्री संत रविदास मागासवर्गीय को-ऑप हौसिंग सोसायटीचे संस्थापक कै. के. एम. डावरे काका यांच्या आशिर्वादाने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मनमाड शहरप्रमुख माधव शेलार यांच्या खंबीर नेतृत्त्वाखाली सदर निवडणुकीमध्ये शिवगर्जना पॅनलचे ९ उमेदवार विजयी झाले. शिवगर्जना पॅनलच्या उमेदवारांना विजयी घोषीत केल्यानंतर सर्वत्र जल्लोष करण्यात आला. श्री संत रविदास मागासवर्गीय को-ऑप हौसिंग सोसायटीची दर पाच वर्षांनी निवडणुक घेण्यात येते सदर निवडणुकीमध्ये सोसायटीतील सर्व सदस्य सहभागी होतात. सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी संपन्न झालेली पंचवार्षिक निवडणूक शांत व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

सदर निवडणुकीत शिवगर्जना पॅनलचे पाटील अनिल रामचंद्र, शेलार माधव सुर्यभान, शिलावट संतोष रामचंद्र, आहिरे संदिप सोमनाथ, शेलार रेशमाबाई सूर्यभान, हिरे इंदुबाई सोनीराम, डावरे राजू कचेश्वर, जाधव राजेंद्र द्वारकानाथ, लोणारी राजेंद्र एकनाथ यांना सोसायटी मतदारांनी पहिली पसंती देवून एकमताने विजयी केले. सर्व विजयी उमेदवारांचे माजी आमदार जगन्नाथ धात्रक, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, शिवसेना उध्दव बाळासाहेब पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख प्रविण नाईक, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, तालुका संघटक संतोष जगताप यांचे मार्गदर्शन व अॅड.उल्हासजी गवांदे , दिपक थोरे , म्युनिसिपल कामगार सेना मनमाड अध्यक्ष नितीन पाटील, किशोर कदम, दिनेश केकाण, वाल्मिक धात्रक, बाळू सुपेकर, धिरज हिरे, निलेश शेलार, हरिष शेलार, गणेश गवळी, विनोद गवळी, रवि आहिरे, शुभम शिलावट, बाळा सनासे, संजय वहाळे, अरुण नगे (नागापूर), सचिन संघवी, शुभम शिलावट, सुनिल डावरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
.